Mumbai Local Train Viral Video: मुंबईतील लोकल ट्रेनमधील गर्दी आणि त्यातून होणारे वाद काही नवीन नाहीत. अशाच एक वादाचा व्हिडाओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामुळे महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
धक्का लागण्यावरून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, सनी रमेश चव्हाण नावाचा मराठी तरुण नेहमीप्रमाणे नालासोपाराहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होता. गाडीत चढत असताना एका परप्रांतीय तरुणाचा त्याला धक्का लागला. सनीने त्याला नम्रपणे 'ढकलू नको' असं सांगितलं. मात्र मुजोर परप्रांतीय तरुणाने थेट अरेरावी करत, 'ट्रेन आहे, धक्का लागणारच'* असे उलट उत्तर दिले आणि सनीसोबत दादागिरी करण्यास सुरुवात केली. प्लॅटफॉर्मवर सुरू झालेले हे भांडण ट्रेनमध्ये चढल्यानंतरही सुरूच राहिले.
'मराठी नाही आली तर काय करणार?'
हा वाद विकोपाला जात असताना सनी चव्हाण याने जेव्हा कॅमेरा सुरू केला, तेव्हा परप्रांतीय तरुणाने कॅमेऱ्यासमोरही शिवीगाळ केली. सनीने त्याला नाव विचारले असता, त्याने नाव सांगण्यास नकार दिला. परप्रांतीय तरुणाने सनी दादागिरी करत त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
पाहा VIDEO
(नक्की वाचा- Solapur-Akkalkot Highway: सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कशी होतेय फसवणूक? हा Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)
सनली या तरुणाला महाराष्ट्रात राहत असल्याने त्याला मराठीतून बोलण्यासा सांगितले. मात्र मला मराठी येत नाही. महाराष्ट्रात राहायला मराठी यायलाच पाहिजे हे गरजेचे नाही. मराठी नाही आली तर काय करणार? असा उलट सवाल केला. तसेच, या तरुणाने व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तर कर, असे आव्हानच सनीला दिले.
या सर्व प्रकरणावर सनी चव्हाणने छातीठोकपणे सांगितले की, "याला धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही. यांचा माज वाढत चालला आहे. मराठी माणसांचा आवाज महाराष्ट्रात कमी होणार नाही."
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: लग्नातील एक घोषणा अन् PMO तील अधिकारी थेट जेलमध्ये , DCP ची स्मार्ट कामगिरी चर्चेत))
सनी चव्हाणने हा व्हिडिओ कुणाल शिंदे या 'मराठी बोलू' हे फेसबुक पेज चालवणाऱ्या तरुणाला पाठवला. त्यानंतर कुणालने हा व्हिडिओ आपल्या पेजवर शेअर केला, ज्यामुळे ही घटना जनतेसमोर आली आहे. अनेकांनी सनीची बाजू घेत या तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.