Marathwada Unseasonal Rain: मराठवाड्याला अवकाळीने झोडपले; 7 जणांचा मृत्यू, शेतीचंही मोठं नुकसान

मराठवाड्यात मागील 24 तासांत अवकाळी पाऊस, वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने मराठवाड्यात वित्तहानी आणि जीवितहानी देखील झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Marathwada Unseasonal rain : राज्यात मराठवाड्यासह अनेक भागात काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मराठवाड्यात मागील 24 तासांत अवकाळी पाऊस, वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने मराठवाड्यात वित्तहानी आणि जीवितहानी देखील झाली आहे. आठवड्याभरात वीज पडून आणि झाड पडून सात जणांचा मृत्यू झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विशेष म्हणजे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मान्सूनपूर्व मशागतीच्या कामावरही या पावसाने विपरीत परिणाम झाला आहे. एकीकडे मराठवाड्यातील शेतकरी पाणीटंचाईचा सामना करत आहेत. तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तर अवकाळी पावसामुळे झालेल्या उन्हाळी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

(नक्की वाचा-  Sand Mafia : वाळू माफियांची दहशत, गस्तीवर असताना पोलिसाला ट्रॅक्टरने चिरडलं)

आठवडाभरात 7 जणांचा मृत्यू

  1. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील कोडापूर येथील शेतवस्तीवर राहणारे अशोक नंदू म्हस्के या शेतकऱ्याचा मृत्यू.
  2. छत्रपती संभाजीनगर शहरातील राजू चित्ते यांच्या गाडीवर झाड पडून त्यांचा मृत्यू झाला.
  3. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील मगरवाडी येथील सचिन मधुकरराव मगर वीज पडून दगावले.
  4. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सायगावातील 59 वर्षीय दिगंबर गायकवाड यांचा वीज पडून मृत्यू.
  5. वडवणी तालुक्यातील अभिमन्यू पांडुरंग नलभे यांचाही वीज पडून मृत्यू झाला आहे.
  6. लातूर जिल्ह्यातील हरंगुळ खुर्द 22 वर्षीय राहुल चंद्रकांत जाधव यांच्या अंगावर विज पडल्यामुळे मृत्यू.
  7. जालना जिल्ह्यातील भाटेपुरी शिवारात वीज पडून विठ्ठल गंगाधर कावळे या शेतकऱ्याचा मृत्यू.
Topics mentioned in this article