Kalyan Mobile Tower Fire Video : कल्याण पश्चिम येथील मोहणे परिसरातील आर.एस.कॉलनी,जयतवन नगर येथे मोबाईल टॉवरला भीषण आग लागल्याची घटना घडली.सुदैवाने अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला काही स्थानिक नागरिकांना मोबाईल टॉवरमधून धूर निघत असल्याचे दिसून आले.नागरिकांनी काही हालचाल करण्यापूर्वीच टॉवरला आग लागली आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने कंबर कसली
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीनं अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणेला कळवलं. मोबाईल टॉवर दाट लोकवस्तीच्या परिसरात असल्याने आग आजूबाजूच्या भागात पसरण्याची भीती निर्माण झाली होती.मात्र,अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे आगीवर वेळेत नियंत्रण मिळविण्यात यश आले.
नक्की वाचा >> Petrol-Diesel : मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेलबाबत केंद्र सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय, 1 जुलै 2026 पासून..
मोबाईल टॉवरच्या आगीचा भयानक व्हिडीओ
— Naresh Shende (@NareshShen87640) June 29, 2026
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.मोबाईल टॉवरला आग नेमकी कशामुळे लागली,याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून याबाबत तपास सुरू आहे.या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र आग आटोक्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
नक्की वाचा >> Video : 65 फूट खोल अमृतकुंडात आढळलं प्राचीन शिवलिंग, महाराष्ट्राच्या या ठिकाणी महादेवाच्या भक्तांची अलोट गर्दी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world