जाहिरात

Kalyan News: 14 वर्षांनंतर नराधम बापाच्या पापाचा हिशोब! कल्याणमधील संतापजनक घटनेत आरोपीला मरेपर्यंत शिक्षा!

Kalyan News: कोर्टाच्या या कडक निर्णयामुळे पीडित मुलीला तब्बल 14 वर्षांनंतर न्यायाचा दिलासा मिळाला आहे.

Kalyan News: 14 वर्षांनंतर नराधम बापाच्या पापाचा हिशोब! कल्याणमधील संतापजनक घटनेत आरोपीला मरेपर्यंत शिक्षा!
Kalyan News: 14 वर्षांनंतर या गुन्हेगाराला कोर्टानं शिक्षा दिली आहे.
कल्याण:

Kalyan News: सख्ख्या जन्माच्या बापानेच नऊ वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची चीड आणणारी घटना कल्याणमध्ये होती. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घृणास्पद प्रकरणात कल्याण न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निकाल दिला आहे. तब्बल 14 वर्षे चाललेल्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर या नराधम बापाला त्याच्या पापाची शिक्षा मिळाली असून, त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.कोर्टाच्या या कडक निर्णयामुळे पीडित मुलीला तब्बल 14 वर्षांनंतर न्यायाचा दिलासा मिळाला आहे.

काय आहे प्रकरण?

हे संपूर्ण मन हेलावून टाकणारे प्रकरण 2012 साली कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले होते. आपल्याच नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बापाने लैंगिक अत्याचार केल्याचा हा अत्यंत भयानक प्रकार घडत होता. 

एका स्थानिक व्यक्तीच्या हे घृणास्पद कृत्य लक्षात आल्यानंतर त्यांनी अजिबात वेळ न दवडता कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून नराधम बापाला बेड्या ठोकल्या.

( नक्की वाचा : Akola News: 'मला इथून घेऊन जा...',फोनवर रडली अन् काही मिनिटांतच सगळं संपलं; अकोल्यातील धक्कादायक घटना )

पोलिसांचा ठोस तपास ठरला न्यायालयासाठी निर्णायक

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी आर पी देशमुख यांनी तातडीने तपास सुरू केला. त्यांनी अत्यंत सखोल आणि शास्त्रोक्त पद्धतीने पुरावे गोळा केले. या तपासाच्या आधारे न्यायालयात सबळ पुरावे सादर करण्यात आले.

अटकेपासून हा आरोपी सातत्याने जेलमध्येच होता. पोलिसांच्या भक्कम पुराव्यांमुळेच 14 वर्षांनंतर या गुन्हेगाराला जन्मठेपेची कडक शिक्षा मिळण्यास मदत झाली.

( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या मुलाच्या कमरेत राहिली इंजेक्शनची सुई; एक्स-रे काढताच आई-वडील हादरले )

कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश लक्ष्मीकांत बिडकर यांनी या संवेदनशील खटल्याचा निकाल देताना आरोपी बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पोलिसांचे ठोस पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी या खटल्यात अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या.

आता या नराधम बापाला उर्वरित आयुष्य तुरुंगाच्या गजाआड घालवावे लागणार आहे. कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती दिली.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com