Turbhe Fire : तुर्भे ट्रक टर्मिनलला भीषण आग, BARC कंपनी शेजारी लागलेल्या आगीमुळे खळबळ

Navi Mumbai Turbhe Fire : आग लागण्याचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किट किंवा ज्वलनशील पदार्थांमुळे आग भडकली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कांबळे, नवी मुंबई

नवी मुंबईतील तुर्भे येथील बीएआरसी (BARC) कंपनीच्या शेजारी असलेल्या ट्रक टर्मिनलमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक टर्मिनलमधील काही ट्रक आणि माल वाहतूक कंटेनर्सना आग लागल्याचे समजते. लाकडी कॅरेट आणि प्लास्टिकमुळे आग क्षणात पसरली. आगीचे लोळ इतके प्रचंड होते की काही मिनिटातच परिसरात धुराचे लोट पसरले. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर मालाचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.

अग्निशमन विभागाचे खबरदारी म्हणून परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले होते. आग लागण्याचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किट किंवा ज्वलनशील पदार्थांमुळे आग भडकली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

पालघरमध्ये केमिकल कंपनीला भीषण

पालघरमधील जुना सातपाटी रोडवरील काशी पाडा परिसरात असलेल्या प्लेटिना नावाच्या केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास ही भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दखल झाल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि रेड अलर्ट असतानाच ही आग लागल्याने परिसरात चिंता परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article