जाहिरात

Mega block: मुंबईकरानो घरा बाहेर पडण्याआधी मेगा ब्लॉकचे वेळापत्रक जरूर पाहा, कुठे-कुठे मेगाब्लॉक? वाचा संपूर्ण

हार्बर मार्गावर ही मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या मार्गावर रविवारी सकाळी 11.05 मिनिटांन पासून दुपारी 4.05 मिनिटापर्यंत हा मेगा ब्लॉक असेल.

Mega block: मुंबईकरानो घरा बाहेर पडण्याआधी मेगा ब्लॉकचे वेळापत्रक जरूर पाहा, कुठे-कुठे मेगाब्लॉक? वाचा संपूर्ण
  • मध्य रेल्वेवर मुंबई विभागात ५ एप्रिल रोजी ठाणे आणि डोंबिवली येथील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी विशेष ब्लॉक आहे
  • प्रभादेवी रोड ओव्हर ब्रिजवरील पॅनल काढण्याचे काम ४ एप्रिल रात्री ११:१५ ते ५ एप्रिल सकाळी ५:४५ पर्यंत होणार आहे
  • सीएसएमटी ते दादर दरम्यान लोकल सेवा ४ एप्रिल रात्री १०:३० पासून ५ एप्रिल सकाळी ६:०० पर्यंत पूर्णपणे बंद राहील
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे रविवारी, 5 एप्रिल रोजी 10 तासांचा विशेष ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. ठाणे आणि डोंबिवली येथील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे प्रलंबित काम आणि प्रभादेवी पुलाचा भाग पाडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते दादर दरम्यानची वाहतूक चार एप्रिलच्या रात्री साडे दहापासून सकाळी सहापर्यंत पूर्णतः विस्कळीत असेल. तांत्रिकदृष्ट्या हा ब्लॉक सुरक्षिततेसाठी अनिवार्य असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलले असून काही गाड्या पनवेल आणि ठाणे स्थानकातच खंडित करण्यात आल्या आहेत. हार्बर मार्गावर ही मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या मार्गावर रविवारी सकाळी 11.05 मिनिटांन पासून दुपारी 4.05 मिनिटापर्यंत हा मेगा ब्लॉक असेल. हा ब्लॉक पनवेल ते वाशी या मार्गावर असेल. 

मुंबईतील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी, तसेच परळ-करी रोड दरम्यानचा 'प्रभादेवी' रोड ओव्हर ब्रिज (ROB) पाडण्यासाठी 5 एप्रिल 2026 रोजी विशेष 'ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक' घेण्यात येणार आहे. या कामामुळे लोकलसह मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे.

नक्की वाचा - Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गात मोठा बदल, प्रमुख धार्मिक स्थळांचे अंतरही बदलले! वाचा सविस्तर

ब्लॉकचा वेळ आणि ठिकाण

  • ठाणे आणि डोंबिवली: 4 एप्रिलच्या मध्यरात्री 12:00 ते 5 एप्रिलच्या सकाळी 10:00 वाजेपर्यंत (10 तास). हे काम प्लॅटफॉर्मच्या लांबी वाढवण्यासाठी केले जात आहे.
  • प्रभादेवी (परळ-करी रोड): 4 एप्रिलच्या रात्री 11:15 ते 5 एप्रिलच्या पहाटे 5:45 वाजेपर्यंत. येथे पुलाचे पॅनल्स काढण्याचे काम चालणार आहे.

लोकल सेवांवर होणारा परिणाम
ब्लॉकच्या काळात सीएसएमटी ते दादर दरम्यानची लोकल सेवा 4 एप्रिलच्या रात्री 10:30 ते 5 एप्रिलच्या सकाळी 6:00 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील. तसेच ठाणे आणि डोंबिवली दरम्यानच्या अनेक फेऱ्या रद्द केल्या जातील. काही गाड्या कुर्ला किंवा दादरपर्यंतच चालवल्या जातील. प्रवाशांच्या सोयीसाठी जलद मार्गावरील गाड्यांना कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर जादा थांबा देण्यात आला आहे. सर्व उपनगरीय गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावतील.

मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये बदल
कोकण कन्या, जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस या गाड्या सीएसएमटीऐवजी पनवेलवरून सुटतील किंवा तिथेच थांबतील. हुसेन सागर, कोणार्क आणि हावडा मेल यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्या ठाणे स्थानकातच थांबवल्या जातील (शॉर्ट टर्मिनेशन). तसेच वंदे भारत, मांडवी आणि तपोवन एक्स्प्रेसच्या वेळेत बदल (रिशेड्यूलिंग) करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com