Mumbai Metro : २०२६ हे वर्ष मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा देणारं वर्ष ठरणार असल्याची चिन्हं आहेत. नव्या वर्षात मुंबईत मेट्रोच्या तीन मार्गिका सेवेत दाखल होणार आहेत. त्यामुळे उपनगरातून मुंबईत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहेत. येत्या वर्षात मेट्रो २ ब, मेट्रो ४, मेट्रो ४ अ आणि मेट्रो ९ या मार्गिका सेवेत दाखल केल्या जाणार आहेत.
मेट्रो २ ब - अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द
मेट्रो ४ - मेट्रो ४ अ - वडाळा-ठाणे-कासारवडवला-गायमुख
मेट्रो ९ - दहिसर-भाईंदर
ठाण्यातील मेट्रो फेब्रुवारीत सुरू होणार...
वरील तिन्ही मार्गिकांमुळे एमएमआरमधील वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळेल. सद्यस्थितीत मेट्रो ९ - दहिसर-भाईंदर या मार्गिकेसाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच हे सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मेट्रो ४ - मेट्रो ४ अ - वडाळा-ठाणे-कासारवडवला-गायमुख या मार्गिकेचं पहिल्या टप्प्यातील सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया फेब्रुवारीत सुरू करण्यात येणार असून त्यानंतर साधारण मार्चमध्ये हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
प्रचंड वाहतूक कोंडी असलेल्या अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द या मेट्रो २ ब मेट्रोची मार्गिका साधारण २३ किमी लांबीची आहे. यामध्ये २२ मेट्रो स्थानकांचा समावेश असून तीन टप्प्यात या मार्गिकेचं काम पूर्ण करून सेवेत दाखल केले जाणार आहे. यातील काही मेट्रो मार्गिकेची कामं २०२५ मध्ये पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र २०२५ मध्ये कामं पूर्ण न झाल्याने आता २०२६ मध्ये या तिन्ही मार्गिका सुरू होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.