जाहिरात

Thane Metro : ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच प्रवाशांच्या भेटीला; कधीपासून होणार सुरुवात?

या नव्या मार्गिकेमुळे ठाणे शहराला पहिली मेट्रो मिळणार आहे, कधीपासून मेट्रो सुरू होणार? कोणकोणती स्थानकं असतील?

Thane Metro : ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच प्रवाशांच्या भेटीला; कधीपासून होणार सुरुवात?

वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 अ मार्गावर गाड्यांच्या चाचणी फेऱ्या सुरू होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाणे शहराला पहिली मेट्रो मार्गिका या वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा

मेट्रो 4 ही 32.32 किमी तर मेट्रो चार अ ही 2.7 किमी लांबीची मार्गिका आहे. या दोन्ही मार्गिंकांवर मिळून 32 स्थानकं असणार आहेत. तीन टप्प्यात विभागलेला वडाळा ते कासारवडवलीपर्यंत विस्तारित मार्ग जवळपास 80 टक्के पूर्ण झाला आहे. कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला भाग डिसेंबर 2025 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर 2026 मध्ये कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा भाग आणि 2027 मध्ये वडाळा हा शेवटचा भाग तयार होईल. कासारवडवली ते  गायमुख यांना जोडणारा ग्रीन लाइन 4 A विस्तार 90 टक्के पूर्ण झाला असून या वर्षाच्या अखेरीस तो उघडण्याची शक्यता आहे. 

Road Accident : अपघातग्रस्त मित्राला भेटायले निघाल्या, वाटेतच मृत्यूने गाठलं; दोन मैत्रिणी जागीच दगावल्या

नक्की वाचा - Road Accident : अपघातग्रस्त मित्राला भेटायले निघाल्या, वाटेतच मृत्यूने गाठलं; दोन मैत्रिणी जागीच दगावल्या

गायमुख ते कॅडबरी जंक्शन मेट्रो मार्गिका  डिसेंबरअखेर...
सध्या गायमुख ते कॅडबरी जंक्शन या मार्गावर मेट्रोच्या ट्रायल रन घेतल्या जाणार असून या पूर्ण झाल्यानंतर आरडीओएसकडून मेट्रो गाड्यांची चाचणी केली जाणार आहे. सर्व तपासण्या आणि चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या वर्षी डिसेंबरअखेरपर्यंत ही मेट्रो मार्गिका सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्लान आहे. 

कोणत्या स्थानकांवर मेट्रो धावणार...
कॅडबरी जंक्शन, माजीवाडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजीनीवाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनीवाडा आणि गायमुख

Listen to the latest songs, only on JioSaavn.com