जाहिरात

Pune Crime news: अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी चक्क 100 रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण...

बलात्काराबरोबर तिची हत्याही 100 रुपयात करायची होती. विशेष म्हणजे ही सुपारी त्या विद्यार्थ्याने आपल्याच शाळेतील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दिली होती.

Pune Crime news: अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी चक्क 100 रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण...
पुणे:

देवा राखुंडे 

सुपारी देण्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या असतील आणि पाहिल्या ही असतील. पण पुण्यातही ही बातमी वाचून तुम्ही हैराणच नाही होणार तर संतापाने लाल व्हाल. ही धक्कादायक घटना पुण्यातील दौंडमधल्या एका नामांकीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडली आहे. इथं शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार करण्यासाठी चक्क 100 रुपयांची सुपारी दिली होती. बलात्काराबरोबर तिची हत्याही 100 रुपयात करायची होती. विशेष म्हणजे ही सुपारी त्या विद्यार्थ्याने आपल्याच शाळेतील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दिली होती. सर्वात भयंकर म्हणते असं कृत्य करण्यामागचे कारण ऐकून तुम्ही ही थक्क व्हाल. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुण्याच्या दौंड शहरात एक नामांकीत इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेतच सुपारी देणारा तो विद्यार्थी. सुपारी घेणारा विद्यार्थी. आणि ज्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार, हत्या करायची होती ती विद्यार्थीनी हे सर्वजण याच शाळेत शिकतात. सुपारी देणाऱ्या विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केली होती. हीबाब संबधीत विद्यार्थीनीने शिक्षकांना सांगितली. त्याचा राग या विद्यार्थ्याच्या मनात होता. त्यातूनच त्याने एक भयंकर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्याने त्या मुलीच्या बलात्कार आणि खूनाची सुपारी देण्याचे ठरवले. 

ट्रेंडिंग बातमी - Crime news: हत्या की आणखी काही? 32 वर्षाय विवाहीतेच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, आता...

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा सर्व प्रकार घडला आहे. वर्गातील एका विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केली होती. ती सही त्याच वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने पाहिली होती. याची माहिती तिने वर्गशिक्षिकेला दिली. याचा राग संबंधित विद्यार्थ्यांने मनात धरला होता. संबंधित विद्यार्थी व त्याच्या मित्राने इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला संबंधित विद्यार्थिनीवर अगोदर बलात्कार कर आणि नंतर तिला मारून टाक यासाठी 100 रुपयांची सुपारी दिली.

ट्रेंडिंग बातमी - Wedding news: 'या' गावातल्या मुलांचं होत नाही लग्न, मुली देतात थेट नकार, काय आहे कारण?

मात्र, ज्या विद्यार्थ्याला याबाबतची सुपारी दिली त्या विद्यार्थ्याने ही सर्व घटना त्या विद्यार्थिनीला येऊन सांगितली. त्यानंतर या विद्यार्थिनीने तिच्या घरी याची माहिती दिली. या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी वर्गशिक्षक, सुपर वायझरसह मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा केली. मात्र त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी दौंड पोलीस ठाणे गाठले.यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग बातमी - Walmik Karad : बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गित्तेच्या पत्नीचे धक्कादायक खुलासे

शाळेनेही हा याप्रकरणात टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. जर का सुपारी बाबत त्या विद्यार्थ्यानेही गंभीर पाऊल उचलले असते तर त्या अल्पवयीन मुलीला आपला जीव ही गमवावा लागला असता. वेळीच त्याने त्या मुलीला सावध केले. शिवाय त्यामुलीनेही आपल्या पालकांना तातडीने याची माहिती दिली. त्याच वेळी शाळा प्रशासनाने संबधीत विद्यार्थ्यावर कारवाई करणे गरजेचे होते. मात्र पुण्यात अलिकडच्या काळात अशा घटना घडताना दिसत आहेत. या घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com