Pune MHADA News: पुणे शहरात स्वतःचे घर असावे, असे स्वप्न पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडा पुणे मंडळाने आता तब्बल १०,००० नवीन घरे उभारण्याचे मोठे नियोजन केले आहे. या घरांचा लाभ विशेषतः मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना मिळणार आहे. म्हाडा पुणे मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकतीच ही घोषणा केली.
Pune Lohagad Case: सियाने लग्नाच्या शॉपिंगसाठी केतनकडून उकळली मोठी रक्कम; एवढ्या पैशांचं काय केलं?
म्हाडाची मोठी घोषणा; पुण्यात 10000 घरे उभारणार
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यात घरांची मागणी प्रचंड आहे आणि म्हाडाच्या योजनांकडे लोकांचा कल नेहमीच वाढता असतो. वाढती मागणी लक्षात घेऊन पुणे शहर आणि ग्रामीण भागात योग्य ठिकाणी या घरांची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पांमधील घरांचे दर सर्वसामान्यांना परवडतील अशा पद्धतीने ठेवले जाणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.
या महत्त्वाच्या निर्णयासोबतच, म्हाडाने जुन्या सोडतीतील शिल्लक सदनिकांबाबतही महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. ज्यांना मागील वेळी घर मिळू शकले नव्हते, त्यांना आता आणखी एक संधी मिळणार आहे. यासाठी लवकरच दुसरी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. घरांच्या बांधकामापासून ते ताबा देण्यापर्यंतचे काम जलदगतीने पूर्ण करण्यावर म्हाडाचा भर असून, जून २०२७ पर्यंत ही घरे ताव्यात दिली जातील, असे नियोजन आहे. या निर्णयामुळे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कसा आहे म्हाडाचा महाप्लॅन?
- एकूण नियोजित नवीन घरे: १०,००० सदनिका
- व्याप्ती क्षेत्र: पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भाग
- ताबा देण्याचा नियोजित कालावधी: ऑगस्ट ते जून २०२७
- अतिरिक्त संधी: शिल्लक राहिलेल्या सदनिकांसाठी दुसरी जाहिरात
(नक्की वाचा- मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाला 'शिंग्रोबा' यांचे नाव द्या! मुख्यमंत्र्यांकडे थेट पत्राद्वारे)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world