Mumbai News : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्या नेमकी काय चर्चा होणार याची उत्सुकता सर्वांना होती. भेटीनंतर उदय सामंत यांनी सांगितलं की, मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उदय सामंत यांनी म्हटल की, "मी एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊन आलो होतो. मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय होतो. राज ठाकरे यांनी काही सूचना केल्या आहेत. त्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करेन."
(नक्की वाचा- Shirdi News : फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी)
"बाकीच्या भाषेचा सन्मान आम्ही करतो तसा आपल्या भाषेचा देखील व्हावा, ही राज ठाकरेंची भूमिका आहे आणि आमची देखील आहे. राज्यातील बँकांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजेत, यासाठी सर्व समित्यांची बैठक घेतली जाईल. तसेच काय कारवाई करता येतील याबाबत निर्णय घेऊ", असंही उदय सामंत यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- मूल दत्तक घ्या! 'अॅडव्हान्सचा राग...', तनिषा भिसेंच्या मृत्यूप्रकरणी मंगेशकर रुग्णालयाचा खुलासा)
"ठाकरे गटातील अनेक अस्वस्थ आजही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. मी पाच माजी खासदारांचा आकडा सांगितला होता ते आलेत. आणखी सहा जण वेटिंगमध्ये आहेत. त्यांचाही पुढील काही काळात पक्षप्रवेश होईल", असंही उदय सामंत यांनी म्हटलं.