जाहिरात

Pune News: पुण्याच्या इंदापूर नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यावर जीवघेणा हल्ला, भरदिवसा चाकूने केले वार

पुण्याच्या इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर नगरपरिषद कार्यालयाबाहेर भरदिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला.

Pune News: पुण्याच्या इंदापूर नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यावर जीवघेणा हल्ला, भरदिवसा चाकूने केले वार
Pune Indapur Anil Pawar Attack News

देवा राखुंडे, प्रतिनिधी 

Indapur Crime News Today : पुण्याच्या इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर नगरपरिषद कार्यालयाबाहेर भरदिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला.या हल्ल्यातून अनिल पवार थोडक्यात बचावले आहेत. नगरपरिषदेतील बैठक संपवून बाहेर येत असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक धाव घेत चॉपर आणि चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात अनिल पवार यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे.पवारांनी प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले विरोधी पक्षनेते अनिल पवार यांची भेट घेऊन विचारपूस केली.यावेळी पवार म्हणाले,"मी या हल्ल्यातून वाचलो असून पोलीस प्रशासन संबंधित हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करेल,अशी अपेक्षा आहे." 

नक्की वाचा >> Palghar News : वसईत संतप्त नागरिकांनी महापालिका आयुक्तांची गाडी अडवली अन्..ऐन पावसाळ्यात नेमकं काय घडलंय?

भाजप नेते प्रवीण माने यांनी घेतली पवारांची भेट 

अनिल पवार यांच्यावर हल्ला होताच त्यांना वाचवण्यासाठी धावून गेलेले वसीम शेख हेही या घटनेत जखमी झाले आहेत.सध्या अनिल पवार आणि वसीम शेख यांच्यावर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, इंदापूरचे भाजपचे नेते प्रवीण माने यांनीही रुग्णालयात जाऊन अनिल पवार यांची भेट घेत विचारपूस केली आहे.

नक्की वाचा >> कंपनीसाठी 5 वर्ष रात्रंदिवस झटली, त्याच कंपनीच्या मिटिंगमध्ये तरुणीला आला धक्कादायक अनुभव, Video व्हायरल

घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास नाळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून या घटनेतील हल्लेखोर कोण आहेत आणि त्यांनी हा हल्ला कोणत्या कारणातून केला याचे नेमके कारण काय याचा पोलीस करत आहेत.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com