शुभम बायस्कर, प्रतिनिधी
Bus Robbery Crime : नागपूरच्या इमामवाडा बस स्थानकातून तब्बल 1 कोटी 53 लाख रुपयांची इलेक्ट्रिक 'शिवाई'बस अमरावती पोलिसांनी अवघ्या काही तासांत जप्त केली आहे.अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी नंदा मार्केट परिसरातून तेलंगणातील आंतरराज्यीय अट्टल बस चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत.विष्णू गणपती नीलावर असं या 23 वर्षीय अट्टल चोरट्याचं नाव आहे.
बसेसमधील महागड्या बॅटऱ्या,टायर आणि डिस्क विकायचा
नागपूरहून चोरी झालेली शिवाई बस अमरावतीत असल्याची माहिती मिळताच,राजापेठ डी.बी.पथकाने गद्रे चौकात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.पोलिसांनी केलेल्या चौकशीत या चोरट्याने अत्यंत धक्कादायक कबुली दिली आहे.त्याने तेलंगणा,हैदराबाद आणि आंध्र प्रदेशमधून आतापर्यंत 20 पेक्षा जास्त बसेस चोरल्या आहेत.
नक्की वाचा >> Pune News: पुण्याच्या इंदापूर नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यावर जीवघेणा हल्ला, भरदिवसा चाकूने केले वार
रात्री चार्जिंगला लावलेली बसही चोरली अन्..
चोरलेल्या बसेसमधील महागड्या बॅटऱ्या,टायर आणि डिस्क काढून तो विकायचा आणि उर्वरित बस तिथेच सोडून पसार व्हायचा.यापूर्वी त्याने नांदेड आणि तिरुमालामधूनही बसेस चोरल्याचे समोर आले आहे.1 जुलै 2026 रोजी रात्री चार्जिंगला लावलेली ही बस त्याने चोरली होती. राजापेठ पोलीस आता या आरोपीला आणि जप्त केलेली बस पुढील कारवाईसाठी नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांच्या स्वाधीन करणार आहेत,अशी माहिती राजापेठचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी दिली आहे.
नक्की वाचा >> कंपनीसाठी 5 वर्ष रात्रंदिवस झटली, त्याच कंपनीच्या मिटिंगमध्ये तरुणीला आला धक्कादायक अनुभव, Video व्हायरल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world