जाहिरात

Mla Balaji Kinikar : "मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर", शिवसेनेच्या आमदाराने असं का म्हटलं?

Ambarnath Politcal News : आमदाiर किंवा कार्यकर्ते यापैकी कुणीही टोलेबाजी करताना कुणाचंही नाव घेतलेलं नाही. त्यामुळे हे सगळं नेमकं कुणाला उद्देशून होतं? याची चर्चा आता अंबरनाथ शहरात रंगली आहे.

Mla Balaji Kinikar : "मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर", शिवसेनेच्या आमदाराने असं का म्हटलं?

निनाद करमरकर, अंबरनाथ

'मी आऊट होणारा प्लेयर नाही, मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर आहे', असं म्हणत अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी रविवारी पुन्हा एकदा टोलेबाजी केली.अंबरनाथच्या खुंटवली परिसरात माजी नगरसेवक संदीप लोटे यांच्या वतीने आयोजित लोटे चषक क्रिकेट स्पर्धेला आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उपस्थिती लावली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आमदार बालाजी किणीकर यांनी आपल्या भाषणादरम्यान 'लोटे परिवाराने क्रिकेटचा खेळ ठेवला हे बरं झालं. असाच तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंगचा खेळ अंबरनाथमध्ये ठेवत राहा, कारण काही लोकांना क्रिकेट खेळायची सवय आहे. पण मी आऊट होणारा प्लेयर नाही, मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर आहे', असं बालाजी किणीकर म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...

तसेच आता तुम्ही फुटबॉलही ठेवा, असं किणीकरांनी म्हणताच लोटे यांनी आता कुस्ती ठेवायची आहे, असं उत्तर दिलं. त्यावरही 'त्यासाठी बॉडी लागते' अशी टोलेबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. 

ट्रेंडिंग बातमी - Dombivli News: इलेक्ट्रिशन, प्लंबर,लेबर बनले बिल्डर, डोंबिवलीतल्या 'त्या' 65 अनधिकृत इमारतींचे गौडबंगाल

आमदार किंवा कार्यकर्ते यापैकी कुणीही टोलेबाजी करताना कुणाचंही नाव घेतलेलं नाही. त्यामुळे हे सगळं नेमकं कुणाला उद्देशून होतं? याची चर्चा आता अंबरनाथ शहरात रंगली आहे. मात्र याला शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीच्या वादाची किनार असल्याचंही बोललं जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: