Political News : "...ही सुरुवात आहे!"; राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांचं विजयी मेळाव्याचं दुसरं पत्रक जारी

Maharashtra Political news : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सर्वांना 5 जुलैच्या विजयी मेळाव्याचं निमंत्रण आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

Uddhav Thackeray-Raj Thackeray : शालेय अभ्यासक्रमात पहिलापासून हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही अध्यादेश सरकारने मागे घेतले आहेत. ठाकरे बंधुंच्या लढ्याला मिळालेल्या यशाचा विजयी मेळावा येत्या 5 जुलै रोजी होत आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्रित दुसरं पत्रक समोर आलं आहे. 

"महाराष्ट्रातला प्रत्येक माणून मराठी बोलताना पाहायचं आहे? मग ही सुरुवात आहे!", असं म्हटत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सर्वांना 5 जुलैच्या विजयी मेळाव्याचं निमंत्रण आहे. वरळीच्या एन. एस. सी. आय. डोम येथे सकाळी या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. 

(नक्की वाचा-  Mumbai News: 'कितने आदमी थे? सरदार दो...', ठाकरे बंधुंच्या 'त्या' बॅनरची होतेय जोरदार चर्चा)

पहिल्या निमंत्रणात काय म्हटले आहे?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या एकत्रित निमंत्रण पत्रात लिहिलंय की,  "आवाज मराठीचा! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं ...! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत. बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या! आम्ही वाट बघतोय ...!"

Topics mentioned in this article