MNS : ‘पगार देतोस की नाही?’... महिलेच्या तक्रारीनंतर मनसेची 'ऑन-द-स्पॉट' ॲक्शन! सलून मालकाला बेदम मारहण, Video

MNS : नवी मुंबईतील सलून मालकाला महिला कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
MNS News : महिलेनं केलेल्या तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी सलून मालकाला मारहाण केली.
नवी मुंबई:

MNS News: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) च्या कार्यकर्त्यांनी 'ऑन द स्पॉट' न्याय करण्याचा आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्याचा आणखी एक प्रकार नवी मुंबईतील कामोठे शहरातून समोर आला आहे. येथील एका सलून मालकाला मनसे कार्यकर्त्यांनी सर्वांसमोर मारहाण केली. संबंधित मालकाने आपल्या एका महिला कर्मचाऱ्याला अनेक महिन्यांपासून पगार दिला नव्हता आणि तिने पगार मागितल्यावर त्याने तिच्याशी कथितरित्या गैरवर्तन आणि शिवीगाळ केली होती, असा आरोप आहे.

पगार न मिळाल्याने मनसेकडे तक्रार

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कर्मचारी कामोठे येथील या सलूनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून काम करत होती. मात्र, वारंवार मागणी करूनही सलून मालक तिला पगार देत नव्हता. जेव्हा महिलेला पगार मिळाला नाही आणि मालकाने तिच्यासोबत कथितरित्या गैरवर्तन आणि शिवीगाळ केली, तेव्हा तिने कामोठे शहरातील मनसे कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवली.

सलूनमध्ये घुसून केली मारहाण

महिलेनं तक्रार मिळताच मनसेचे कार्यकर्ते त्वरित कामाला लागले. मनसेचे कार्यकर्ते थेट त्या महिला कर्मचाऱ्याला सोबत घेऊन सलूनमध्ये पोहोचले. त्यांनी सुरुवातीला सलून मालकाला पगार न देण्याबद्दल जाब विचारला आणि त्यानंतर बघता बघता संतप्त कार्यकर्त्यांनी सलून मालकाला कानशिलात आणि ठोशांनी मारायला सुरुवात केली. या घटनेचा VIDEO देखील समोर आला आहे, ज्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते सलून मालकाला घेरून मारहाण करताना दिसत आहेत.

( नक्की वाचा : Kolhapur News : भीषण नैराश्य! कोल्हापूरमध्ये 6 महिला डान्सर्सचा जीवघेणा 'सामूहिक निर्णय', काय आहे कारण? )
 

या घटनेमुळे पुन्हा एकदा मनसेच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती अधोरेखित झाली आहे. हे प्रकरण पगार न देणे आणि महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन करण्याशी संबंधित असले तरी, कायद्याचे राज्य आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कारवाईची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. या प्रकरणी सलून मालकावर कायदेशीररित्या काय कारवाई करण्यात आली आहे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर कायदा हातात घेतल्याबद्दल काय कारवाई केली जाईल, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

Advertisement

इथे पाहा Video

Topics mentioned in this article