जाहिरात

Kolhapur News : भीषण नैराश्य! कोल्हापूरमध्ये 6 महिला डान्सर्सचा जीवघेणा 'सामूहिक निर्णय', काय आहे कारण?

Kolhapur News : कोल्हापुरातील महिला निरीक्षणगृहात ठेवण्यात आलेल्या सहा नृत्यांगनांनी आज (शुक्रवार) सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Kolhapur News  : भीषण नैराश्य! कोल्हापूरमध्ये 6 महिला डान्सर्सचा जीवघेणा 'सामूहिक निर्णय', काय आहे कारण?
Kolhapur News :कोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.
कोल्हापूर:

विशाल पुजारी, प्रतिनिधी

Kolhapur News : कोल्हापुरातील महिला निरीक्षणगृहात ठेवण्यात आलेल्या सहा नृत्यांगनांनी आज (शुक्रवार) सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. निरीक्षणगृहातून सुटका मिळावी यासाठी या नृत्यांगनांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी (17 ऑक्टोबर) सकाळी सुमारे 11 वाजता कोल्हापूरमधील महिला निरीक्षणगृहात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सहा नृत्यांगनांनी अचानकपणे आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी हाताची नस कापण्याचा प्रयत्न करत आयुष्य संपवण्याची तयारी केली होती. निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार येताच एकच गोंधळ उडाला. तातडीने या सहा नृत्यांगनांना कोल्हापुरातील सीपीआर (CPR) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती पसरताच पोलिसांनी तात्काळ सीपीआर रुग्णालयात धाव घेऊन या महिलांबाबत अधिक माहिती घेतली.

या प्रकरणात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी करवीर पोलिसांनी एका खासगी रिसॉर्टवर छापा टाकून या नृत्यांगना आणि एका महिला एजंट अशा एकूण 7 महिलांना ताब्यात घेतले होते. तेव्हापासून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. यापैकी एक महिला सध्या कळंबा कारागृहात आहे, तर उर्वरित 6 महिलांना महिला निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. करवीर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अश्लील नृत्य आणि इतर गुन्ह्याखाली गुन्हा नोंद आहे.

( नक्की वाचा : Dhule News: धुळे हादरले! पोलिसांनी गुन्हेगारांना पाठीशी घातले? सरपंच दाम्पत्याचा डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न )

सुटका न झाल्याने नैराश्य?

पीडित महिलांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, या सहा नृत्यांगनांना एक वर्षासाठी निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. त्या सतत जामीन मिळावा अशी मागणी करत होत्या. दोन महिने उलटूनही सुटका झाली नाही, तसेच कुटुंबीयांना त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे सुटका होत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी हा प्रयत्न केला असावा, अशी शंका नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी पीडित महिलांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 30 ऑक्टोबरला होणार आहे.
 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com