जाहिरात

Maharashtra Weather News: 'टाईम प्लीज' घेतलेला पाऊस पु्न्हा परतणार; येत्या 2-3 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पुण्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे, हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 

Maharashtra Weather News: 'टाईम प्लीज' घेतलेला पाऊस पु्न्हा परतणार; येत्या 2-3 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज

रेवती हिंगवे, पुणे

Monsoon Alert : मे महिन्याच्या अखेरीस आणि जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली.  मात्र मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार आहे.  येत्या 13 जूनपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मॉन्सून परतणार आहेत, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. 

राज्यातील अनेक जिल्ह्यांना आगामी चार दिवस पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.  तर 12 आणि 13 जून रोजी पुणे ,कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  पुणे शहरासह जिल्ह्यात देखील 13 जून रोजी पावसाची शक्यता आहे. 

राज्यात शुक्रवारनंतर मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. 

(नक्की वाचा - Modi Government : मोदी सरकारला 11 वर्षे पूर्ण, भाजप मंत्र्यांकडे मोठी जबाबदारी; मुख्यमंत्रीही घेणार पत्रकार परिषद)

आज कसं असेल हवामान?

कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

(नक्की वाचा- Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला आणखी एक चाळणी; 'या' महिलांना मिळणार नाही लाभ)

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पुण्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे, हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 

आज कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट? 

राज्यात आज अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा याठिकाणा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com