देवा राखुंडे, प्रतिनिधी
Baramati Accident News : बारामती पारवडी मार्गावर दुचाकी आणि चार चाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. तर मृत महिलेचा पती आणि तिचा लहान मुलगा हे देखील या अपघातात गंभीर जखमी झाले. काल मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. रूपाली मयूर कोकणे असं मृत महिलेचे नाव आहे. तर सानवी मयूर कोकणे (5) असं अपघातात मृत पावलेल्या चिमुकलीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचा पती मयूर कोकणे आणि तिचा 2 वर्षांचा लहान मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बारामती तालुक्यातील पारवडी येथील कोकणे वस्तीवरील कोकणे कुटुंब बारामतीकडून पारवडी मार्गे दुचाकीवरून निघाले होते.
नक्की वाचा >> Akola News : एका भावाने दुसऱ्या भावावर केला चाकू हल्ला, नंतर घडली सर्वात भयंकर घटना, धक्कादायक कारण आलं समोर
पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरु
याचदरम्यान बारामती पारवडी मार्गावर परीट वस्तीलगत खडकीकडून बारामतीच्या दिशेकडे येणाऱ्या चारचाकी वाहनाची दुचाकीला जोरात धडक बसली. या दुर्घटनेत मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. या अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.