यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
MPSC Stenographer And Typist Exam News : राज्य सरकारने लघुलेखक (स्टेनोग्राफर)आणि टंकलेखक (टायपिस्ट)पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)मार्फत करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द केला असून,त्यासाठी प्रस्तावित परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत.या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.
पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आहेत.लघुलेखक आणि टंकलेखक पदांसाठी अनेकांनी विशेष प्रशिक्षण घेतले होते.शॉर्टहँड,टायपिंग गती,संगणक कौशल्ये यासाठी त्यांनी वेळ आणि पैसा खर्च केला.मात्र अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली.
नक्की वाचा >> Mumbai News: प्रवाशांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेकडून 34 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या, पाहा संपूर्ण यादी
कोणतीही पूर्वसूचना न देता परीक्षा रद्द
उमेदवारांचे म्हणणे आहे की,शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता परीक्षा रद्द केल्याने त्यांच्या करिअरवर परिणाम झाला आहे.अनेकांनी इतर नोकरीच्या संधी बाजूला ठेवून या भरतीवर लक्ष केंद्रीत केले होते.आता नव्याने दिशा ठरवावी लागणार असल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. काही उमेदवारांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत,सरकारने याबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यात मृत व्यक्तीच्या नावे कोट्यावधींची मालमत्ता हडपली, मास्टरमाईंडसह अख्खी टोळी खाणार जेलची हवा
जर भरती प्रक्रिया बदलायची असेल,तर पर्यायी मार्ग स्पष्ट करून उमेदवारांना दिलासा द्यावा,अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान या निर्णयामागील कारणांबाबत सरकारकडून अद्याप सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून,पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.