MSEB TOD Meter: टीओडी मीटर काय आहे ? ग्राहकांना होईल मोठा फायदा

MSEB TOD Meter : टीओडी मीटर म्हणजे 'टाइम ऑफ डे मीटर'. नावाप्रमाणेच हे मीटर दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेनुसार विजेच्या वापराची नोंद करते.

जाहिरात
Read Time: 2 mins

MSEB TOD Meter : महावितरणने वीज ग्राहकांसाठी एक नवीन आणि आधुनिक प्रणाली 'टीओडी' (Time of Day - TOD) मीटर आणली आहे. नवीन वीज जोडणीसाठी असो किंवा सदोष आणि नादुरुस्त मीटर बदलताना, हे टीओडी मीटर बसवण्याचा महावितरणकडून सल्ला दिला जात आहे. या मीटरमुळे ग्राहकांना अनेक फायदे मिळतील, असे महावितरणने त्यांच्या पत्रकात नमूद केले आहे.

टीओडी (TOD) मीटर म्हणजे काय?

टीओडी मीटर म्हणजे 'टाइम ऑफ डे मीटर'. नावाप्रमाणेच हे मीटर दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेनुसार विजेच्या वापराची नोंद करते. महावितरणने स्पष्ट केले आहे की, हे मीटर प्रीपेड मीटर नाहीत. सध्याच्या मीटरप्रमाणेच ही पोस्टपेड प्रणाली आहे, म्हणजेच तुम्हाला वापरलेल्या विजेचे बिल दरमहा येईल. बिलिंग प्रणालीमध्ये यामुळे कोणताही बदल होणार नाही. तुमचं सध्या जसं बिल येतं, तसंच बिल यापुढेही येईल.

(नक्की वाचा- Kolhapur Crime: डॉक्टरसह 14 शिक्षकांकडून कोट्यवधी रुपये लुटले, कोल्हापुरात खळबळ, प्रकरण काय?)

टीओडी मीटरचे फायदे

महावितरणनुसार, टीओडी मीटरचे ग्राहकांना अनेक फायदे मिळणार आहेत. या मीटरमुळे विजेच्या दरांमध्ये सवलत मिळू शकते. स्वस्त वीज दरांच्या स्लॅबसाठी हे मीटर उपयोगात येईल, म्हणजे विजेचा वापर ऑफ-पिक अवर्समध्ये केल्यास कमी दर लागू होऊ शकतात. सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी 'नेट मिटरिंग' आणि विजेचे अचूक रिडिंग मिळवण्यासाठी हे मीटर महत्त्वाचे ठरेल. या मीटरचे रिडिंग तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सहज उपलब्ध होईल. अगदी मिनिटा-मिनिटांचे रिडिंगही मोबाईलवर पाहता येणार असल्याने ग्राहकांना त्यांच्या वीज वापराचे अधिक अचूक विश्लेषण करता येईल.

टीओडी मीटर मोफत आणि अनुदानावर

महावितरण हे मीटर ग्राहकांना मोफत बसवून देणार आहे. यासाठी प्रीपेड चार्जिंग करण्याची आवश्यकता नाही. जुन्या वीज मीटरची उपयुक्तता संपल्यानंतर महावितरणकडून नव्या तंत्रज्ञानाची मीटर लावण्यात येतात आणि याच प्रणालीचा हा एक भाग आहे.

Advertisement

(Matheran : माथेरानात तोबा गर्दी, विकेंडला 50 हजारांहून अधिक पर्यटकांची हजेरी, रस्त्यावर रांगा; टॅक्सीचालक हैराण!)

सध्या नवीन वीज जोडणी तसेच सदोष आणि नादुरुस्त मीटर असलेल्या ठिकाणी हे नवे मीटर प्राधान्याने लावण्यात येत आहेत. नवीन टीओडी मीटरसाठी महावितरणला कोणताही आर्थिक भार सोसावा लागणार नाही, कारण राज्य सरकारांना आरडीएसएस (RDSS) योजनेतून हे आधुनिक डिजिटल मीटर राज्यातील वीज ग्राहकांना बसवण्यासाठी केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे.

Topics mentioned in this article