
विशाल पुजारी, कोल्हापूर:
Kolhapur Fraud Case: कोल्हापुरात दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून डॉक्टर, शिक्षकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राधानगरी तालुक्यातील 14 शिक्षकांना सव्वा तीन कोटींचा गंडा तर करवीर तालुक्यातील डॉक्टरांना 1 कोटीचा गंडा घालण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. 2021 ते 2023 या काळात ज्यादा परतव्याचे आमिषाने ही गुंतवणूक केली होती. या प्रकरणी राधानगरी आणि शाहूपुरी पोलिसात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
Digital Arrest Scam: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक प्रकरणात 9 जणांना जन्मठेप, देशातील पहिली कारवाई!
समोर आलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून डॉक्टर शिक्षकांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. राधानगरी तालुक्यातील 14 शिक्षकांना सव्वा तीन कोटींची गंडा घालण्यात आला आहे तर करवीर तालुक्यातील कसबा बावडा येथील डॉक्टरला एक कोटींचा गंडा घालण्यात आला आहे.
शिक्षकांच्या फसवणूकीचा राधानगरी पोलीस ठाण्यात तर डॉक्टरांना झालेल्या फसवणूकीचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे. दोन्ही प्रकरणात मिळून 4 कोटीहून अधिकची फसवणूक झाली आहे. 2021 ते 2023 या काळात ही फसवणूक झालीये. ज्यादा परताव्याच्या मोहामूळे ही गुंतवणूक करण्यात आली होती. तब्बल दोन तीन वर्षांपूर्वीची ही प्रकरणे आता समोर येत आहेत. या संपूर्ण फसवणूक प्रकरणामध्ये एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News: मोबाईल लिंकद्वारे हॅकिंग! जोगेश्वरीतील रहिवाशाच्या खात्यातून लाखो उडाले
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world