जाहिरात

Matheran : माथेरानात तोबा गर्दी, विकेंडला 50 हजारांहून अधिक पर्यटकांची हजेरी, रस्त्यावर रांगा; टॅक्सीचालक हैराण!

मुंबईपासून जवळपास असलेल्या सर्वच जिल्ह्यात पावसाळी पर्यटन असलेले डोंगराळ भागातील धबधबे पर्यटकासाठी बंद असल्याने पर्यटकांनी माथेरान ते नेरळ परिसरातील डोंगरदऱ्यात भटकंती पसंत केल्याने मोठया प्रमाणात पर्यटक माथेरानला आले होते.

Matheran : माथेरानात तोबा गर्दी, विकेंडला 50 हजारांहून अधिक पर्यटकांची हजेरी, रस्त्यावर रांगा; टॅक्सीचालक हैराण!

मेहबूब जमादार, प्रतिनिधी

Tourists in Matheran : पावसाळा सुरू होताच नागरिकांची पावलं गड-किल्ले, धबधबे, डोंगराळ भागाच्या दिशेने वळतात. मुंबई आणि पुण्यातून जवळच असलेलं माथेरान हे पर्यटकांचं एक आवडतं ठिकाण. दरवर्षी राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक माथेरानात येतो आणि निसर्गाचा आस्वाद घेतो. त्यात सुट्टी असती तर माथेरानातही मोठी गर्दी होते. 

12 ते 13 जुलै रोजी विकेंडला माथेरानात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अवघ्या दोन दिवसात माथेरानात 50 हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावल्याचं समोर आलं आहे. माथेरानच्या दऱ्याखोऱ्यात ट्रेकिंगसाठी पर्यटकांकडून मोठी पसंती दिली जाते. थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या गिरीस्थान माथेरानमध्ये विकेंडला पावसाळ्यात पर्यटकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला. शनिवार आणि रविवार या विकेंडच्या सुट्ट्यांमुळे मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईतील पर्यटकांची माथेरानला मोठया प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. या दोन दिवसात जवळ जवळ 50 हजारांपेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली.

Benefits of drinking hot water गरम पाणी आहे अमृतासमान, फायदे आहेत इतके की थक्क व्हाल

नक्की वाचा - Benefits of drinking hot water गरम पाणी आहे अमृतासमान, फायदे आहेत इतके की थक्क व्हाल

मुंबईपासून जवळपास असलेल्या सर्वच जिल्ह्यात पावसाळी पर्यटन असलेले डोंगराळ भागातील धबधबे पर्यटकासाठी बंद असल्याने पर्यटकांनी माथेरान ते नेरळ परिसरातील डोंगरदऱ्यात भटकंती पसंत केल्याने मोठया प्रमाणात पर्यटक माथेरानला आले होते. त्यामुळे या दोन दिवसात पन्नास हजारांहून जास्त पर्यटकांनी भेट दिली. 

बेशिस्त पर्यटकांमुळे मनस्ताप...

काही बेशिस्त पर्यटकांचा फटका इतरांसह टॅक्सीचालकांनाही सहन करावा लागला. रविवारी संध्याकाळी पर्यटकांनी पुन्हा घरी जाण्यासाठी माथेरान सोडल्यावर तीन - तीन रांगा टॅक्सी स्टॅन्डजवळ पाहायला मिळाल्या. परंतु पर्यटकांच्या येणाऱ्या जाणाऱ्या खाजगी वाहनामुळे नेरळ माथेरानचे नेहमीचे टॅक्सी चालकही माथेरानच्या घाटात वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. त्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीत आणि टॅक्सी स्टॅन्डवर ताटकळत वाट पाहावी लागत होती.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com