15% Discount On ST Bus Rides : एसटीच्या आगाऊ आरक्षणावर मिळेल घसघशीत सूट, कसा मिळवाल फायदा?

15% Discount On ST Bus Rides : ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी 1 जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

15% Discount On ST Bus Rides : एस.टी.च्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (150 कि.मी.पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिनांक 30 जून 2025 रोजी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये 15 टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती. या घोषणेनुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी 1 जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे. 

(नक्की वाचा: टायर ट्यूबवरून शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास, पावसापाण्यातून विद्यार्थ्यांचा संघर्ष)

आषाढी एकादशीसाठी करा सवलतीच्या दरात बुकींग

येत्या आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi ST Bus Booking) व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण (Ganpati Utsav Advance Bus Booking) करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बससेवेचे आरक्षण प्रवाशांना त्यांच्या तिकीट दरात 15 टक्के सवलत उद्यापासून म्हणजेच 1 जुलैपासून लागू होत आहे. तथापि जादा बसेससाठी ही सवलत लागू होणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्या प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या सवलतीचा लाभ घेता येऊ शकतो.

Advertisement

(नक्की वाचा: मेट्रोचा दरवाजा बंद झाल्याने चिमुकला अडकला, कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; पाहा VIDEO)

ई-शिवनेरीच्या प्रवाशांनाही मिळेल लाभ

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित ई-शिवनेरी बसमधील प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, npublic.msrtc.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा MSRTC Bus Reservation या मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना 15% सवलत प्राप्त करता येऊ शकते.
 

Advertisement