
मुंबईकरांना सावध राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. 24 ते 27 जुलै 2025 या कालावधीत सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे समुद्रा जवळ जाणे टाळावे असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. भरतीवेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे. तसेच यासंदर्भात प्रशासनाकडून जारी इतर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या भरती वेळी समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. यावेळी समुद्राला उधाण येणार आहे.
नक्की वाचा - Javed Sheikh: काम ड्राव्हरचं, घर पत्र्याचं, तरही 500 कोटीचा मालक, कोण आहे जावेद शेख?
गुरुवार 24 जुलै 2025 ते रविवारी 27 जुलै 2025 या कालावधीदरम्यान सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. तर, दिनांक 26 जुलै 2025 रोजी समुद्रात सर्वात मोठी म्हणजे 4.67 मीटर इतक्या उंचीची लाट उसळणार आहेत. भरती काळादरम्यान नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच, या अनुषंगाने प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेडून नागरिकांना करण्यात येत आहे.
जुलै 2025 महिन्यातील भरतीसंदर्भात माहिती
- 1. गुरुवार, दि. 24.07.2025 सकाळी – 11.57 वा. लाटांची उंची (मीटर) - 4.57
- 2. शुक्रवार, दि. 25.07.2025 दुपारी – 12.40 वा. लाटांची उंची (मीटर) - 4.66
- 3. शनिवार, दि. 26.07.2025 दुपारी – 01.20 वा. लाटांची उंची (मीटर) - 4.67
- 4. रविवार, दि. 27.07.2025 दुपारी – 01.56 वा. लाटांची उंची (मीटर) - 4.60
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world