Mumbai News : मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपावर अखेर तोडगा निघाला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टाईला यश आलं आहे. २१ जूनच्या रात्री बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली होती. यामध्ये सर्व प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात आली. यामध्ये बेस्टचा संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली. याशिवाय उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ बससेवा सुरळीत करण्याबाबत आदेश दिले. त्यामुळे उद्या २२ जून रोजी सकाळी मुंबईकरांना बसने सुरळीत प्रवास करता येणार आहे.
बेस्टचा संप अखेर मागे...
एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, यावेळी बेस्ट डेपोमधील दुराव्यस्थासारख्या अनेक बाबी पुढे आल्या. लोकांना सेवा देताना जे सेवा देत आहेत त्यांची व्यथा समजून घ्यायला हवी. बेस्टच्या कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युइटीची रक्कम या आर्थिक वर्षात देण्यात आली. पुढील ३ वर्षात ५००० ईबस विकत घेण्यात येतील. बेस्ट स्वतःच्या पायावर उभी राहायला हवी, यासाठी महसुल वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील.
आज २१ जून रोजी बेस्ट संपाचा तिसरा दिवस होता. त्यात सोमवारपासून प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता या संपावर तोडगा निघणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जात होतं. गेले तीन दिवस मुंबईकरांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला. आज नीटची परीक्षा असल्याने MSRTC कडू अतिरिक्त १०० बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
नक्की वाचा - Rain Update : पुढील 2 दिवस मुंबई-ठाण्यात कसं असेल वातावरण; छत्रीची गरज लागणार की नाही?
बेस्टच्या प्रमुख मागण्या काय?
- बेस्टचा स्वतंत्र अर्थसंकल्प न ठेवता, मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करा
- बेस्टचे कंत्राटीकरण थांबवा
- निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी एकत्रित द्या
- बेस्ट मालमत्तांचा पीपीपी तत्वावर पुनर्विकासाला विरोध