जाहिरात

Rain Update : पुढील 2 दिवस मुंबई-ठाण्यात कसं असेल वातावरण; छत्रीची गरज लागणार की नाही?

मुंबईकरांना अखेर कडक उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मुंबईसह उपनगरात आज पावसाने हजेरी लावली.

Rain Update : पुढील 2 दिवस मुंबई-ठाण्यात कसं असेल वातावरण; छत्रीची गरज लागणार की नाही?

Mumbai Rain Update : मुंबईकरांना अखेर कडक उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मुंबईसह उपनगरात आज पावसाने हजेरी लावली. भीषण उन्हाळा आणि बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ऋतूतील हा पहिला चांगला पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवार २१ जून रोजी सकाळच्या पहिल्या काही तासात घाटकोपरमध्ये तब्बल २४ मिमी, वरळीत २५ मिमी, लोअर परेलमध्ये २१ मिमी आणि चेंबूरमध्ये २० मिमी पाऊस नोंदविण्यात आला. 


२२ आणि २३ जून रोजी कसं असेल वातावरण? 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २२ जून आणि २३ जून रोजी मुंबईला यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. IMD ने मुंबईतील अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई आणि ठाण्यात २२ ते २४ जूनपर्यंत यल्लो अलर्ट देण्यात आला असून सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज आहे. ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. याशिवाय मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याचा अदमास आहे. दुसरीकडे पालघरमध्येही २२ ते २३ जून रोजी यल्लो अलर्ट देण्यात आला असून तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये गुरुवारी २५ जून रोजीही हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

नक्की वाचा - Pune News : पुण्याजवळील धबधब्याने बहरणाऱ्या प्रदेशाचं हे काय झालं? धनगर समाजाने मांडली व्यथा

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून २३ जूनच्या जवळपास महाराष्ट्रातील अन्य भागातून पुढे सरकेल. मुंबई आणि जवळपासच्या भागात रेनबँड तयार झाल्याचीही माहिती आहे. याशिवाय पश्चिमी घाटावरुन वादळी ढग तयार झाले आहेत. जे जलद गतीने किनाऱ्याच्या दिशेने सरकत आहेत. मुंबईत पाऊस आणणाऱ्या ढगांना क्यूम्यलोनिम्बस म्हटलं जातं. हे ढग जमीनीवरील गरम हवा जलद गतीने वर जाते आणि थंड होऊन पाण्याच्या स्वरुपात खाली बरसते. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील मध्य स्तरावर कोरडी हवा जमा झाली होती. ज्यामुळे पावसाला अडथळा येत होता. 


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com