तुकाराम मुंढेंना हलक्यात घेतलं; नरिमन पॉईंट येथील प्रसिद्ध हॉटेलसह 6 हॉटेल्सला दणका, FDA ची मोठी कारवाई

Mumbai News: महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील नरिमन पॉईंट येथील 'फ्लिंट अँड वारसा' या नामांकित हॉटेलसह 6 मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सविरुद्ध महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू आणि पॉश समजल्या जाणाऱ्या नरिमन पॉईंट परिसरातील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटसह मुंबईतील एकूण 6 आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने एफडीएने निलंबित केले आहेत. राज्यभरात सुरू असलेल्या विशेष अंमलबजावणी मोहिमेचा भाग म्हणून ही धडक कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नरिमन पॉईंटच्या 'फ्लिंट अँड वारसा' वर छापा

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी 27 जून रोजी नरिमन पॉईंट येथील 'फ्लिंट अँड वारसा' रेस्टॉरंटची अचानक तपासणी केली. या तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना धक्कादायक बाबी आढळून आल्या. हॉटेलमध्ये नियमांचे उल्लंघन करून तयार केलेली उत्पादने आढळली, ज्यांचे 5 नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठवण्यात आले असून 11,350  रुपयांचा साठा जप्त केला आहे. तब्बल 16,201 रुपये किमतीचा अन्नपदार्थांचा साठा त्यांची मुदत संपल्यानंतरही तसाच साठवून ठेवण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी हा साठा जागीच नष्ट केला.

Advertisement

(नक्की वाचा-  VIDEO: त्र्यंबकेश्वरमध्ये चमत्कार! अमृतकुंडातील लुप्त झालेल्या प्राचीन शिवलिंगाचे अचानक दर्शन)

कोणत्या हॉटेल्स-बेकरीवर कारवाई?

  1. 'फ्लिंट अँड वारसा', नरिमन पॉईंट
  2. एमके बेकरी, बोरिवली
  3. हॉटेल श्री कृष्ण, भांडुप
  4. हॉटेल गोपाल कृष्ण, सांताक्रूझ
  5. करक एन्टरप्रायझेस, अंधेरी
  6. मद्रास डायरिज्- वांद्रे

उपनगरातील हॉटेल्समध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

सोमवारी एफडीएच्या पथकाने मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील बोरिवली, सांताक्रूझ, अंधेरी, वांद्रे आणि भांडुप परिसरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरीवर छापे टाकले. या नामांकित हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात  सर्रासपणे झुरळे आणि उंदीर फिरताना आढळले. तसेच कच्चा अन्नपदार्थांचा साठा अत्यंत अस्वच्छ आणि आरोग्याला घातक अशा ठिकाणी करून ठेवण्यात आला होता. 

अनेक हॉटेल्सकडे आवश्यक असणारी वैध कागदपत्रे नव्हती, तर तिथल्या कर्मचाऱ्यांची कोणतीही बंधनकारक वैद्यकीय आरोग्य तपासणी करण्यात आलेली नव्हती. स्वच्छतेचा अभाव, निकृष्ट दर्जाची रेफ्रिजरेटर यंत्रणा आणि ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने या 6 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

(नक्की वाचा-  पेट्रोल, डिझेल, जेट इंधनावरील 'विंडफॉल टॅक्स' आजपासून बदलला! पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार की कमी होणार?)

राज्यभरात मोहीम, 34 लाखांचा गुटखा जप्त

एफडीएने केवळ मुंबईतच नव्हे, तर 26 जून ते 28 जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 31 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत सरकारने प्रतिबंधित केलेला पान मसाला आणि गुटखा यांचा तब्बल 34.87 लाखांचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला. या बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री प्रकरणी 19 लोकांना अटक करण्यात आली. 

Topics mentioned in this article