Mumbai News: फ्रीजचा स्फोट! पहाटे झोपेतच गोरेगावातील एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू

Mumbai News: विषारी धुरामुळे झोपेत असलेल्या तिघांना सावरण्याची किंवा घराबाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. घरातून धूर आणि आगीचे गोळे बाहेर पडताना पाहून शेजाऱ्यांनी आरडाओरडा केला आणि तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, मुंबई

Mumbai News: मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास घरात लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. फ्रीजचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून, या घटनेने गोरेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

भगतसिंग नगर येथील एका अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. पहाटेच्या वेळी घरातील सर्व सदस्य शांत झोपले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अचानक घरातील फ्रीजचा जोरदार स्फोट झाला आणि काही सेकंदातच आगीच्या ज्वाळा संपूर्ण घरात पसरल्या. फ्रीजच्या स्फोटामुळे आणि त्यातून निघालेल्या विषारी धुरामुळे झोपेत असलेल्या तिघांना सावरण्याची किंवा घराबाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. घरातून धूर आणि आगीचे गोळे बाहेर पडताना पाहून शेजाऱ्यांनी आरडाओरडा केला आणि तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.

(नक्की वाचा-  Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

अग्निशमन दलाची धाव

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, आगीची तीव्रता एवढी भीषण होती की मदत पोहोचण्यापूर्वीच तिघांनी आपले प्राण गमावले होते. अग्निशमन दलाने आग विझवून मृतदेह बाहेर काढले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

फ्रीजचा स्फोट का होतो?

प्राथमिक तपासात ही आग फ्रीजमधील शॉर्ट सर्किट किंवा गॅस लीक होऊन झालेल्या स्फोटामुळे लागल्याचे बोलले जात आहे. फ्रीजचा स्फोट टाळण्यासाठी काय केले पाहिजे?

Advertisement
  • फ्रीजचे वायरिंग जुने झाले असल्यास किंवा कट झाले असल्यास ते तातडीने बदलावे.
  • फ्रीज आणि भिंत यामध्ये किमान 6 इंचाचे अंतर असावे, जेणेकरून कॉम्प्रेसरमधून निघणारी उष्णता बाहेर पडू शकेल.
  • व्होल्टेज कमी-जास्त होत असल्यास चांगल्या दर्जाचा स्टेबलायझर वापरावा.
  • फ्रीजच्या एकाच सॉकेटमध्ये अनेक प्लग लावू नयेत.

Topics mentioned in this article