मुंबई - गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुंबईतून देवरुखच्या दिशेने जाणारी कार खेडमधील जगबुडी नदीपात्रात बुडाल्याची माहिती आहे. या अपघातात कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज पहाटेच्या वेळी हा अपघात झाला. हे कुटुंब अंत्यसंस्कारासाठी देवरुखच्या दिशेने निघाले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान या कुटुंबावर काळाचा घाला पडला आणि पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. हे कुटुंब मुंबईतील मीरा रोड येथून देवरुखच्या दिशेने निघाले होते. या प्रवासात कुटुंबीयांचा दुर्दैवी अंत झाला.
नक्की वाचा - Mumbai Crime: तिहेरी हत्याकांडाने मुंबई हादरली! दोन कुटुंबाचा वाद, जीवघेण्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू
दरम्यान खोपोलीहून मुंबईला परतत असताना भाजप नेते आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या कारचा अपघात झाल्याची माहिती आहे. कळंबोलीजवळ हाजी अराफत शेख यांच्या ताफ्यासह पाच ते सहा गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे. रात्री 8 वाजता हा अपघात घडल्याची माहिती आहे.