Mumbai home sales: मुंबईत घरांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट, निवडणुकीशी काय आहे कनेक्शन?

घरांच्या विक्रीत झालेली घट, या मागे प्रमुख कारण हे विधानसभा निवडणुका असल्याचे सांगण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

मुंबईसह संपुर्ण एमएमआर रिजनमध्ये ऑक्टोबर-डिसेंबर 2024 या तिमाही मध्ये घरांच्या विक्रीत कमालीची घट झालेली दिसते. मुंबईसह, नवी मुंबई, ठाण्यात त्याचा परिणाम दिसून आला आहे. जवळपास 31 टक्क्यांने ही घट झाल्याचे समोर आले आहे. प्रॉपटायगर डॉटकॉम या डिजिटल रिअल इस्टेट व्यवहार आणि सल्ला देणाऱ्या संस्थेच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. या मागचे प्रमुख कारण काय आहे, हे ही प्रॉपटायगर डॉटकॉमच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतातील आठ प्रमुख शहरांमध्येही घरांच्या विक्रीत घट झाली आहे. ही घट 26 टक्के असल्याचे या अहवालात म्हटले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

घरांच्या विक्रीत झालेली घट, या मागे प्रमुख कारण हे विधानसभा निवडणुका असल्याचे सांगण्यात आलं आहे. या कालावधीत महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभा निवडणुकी झाल्या. त्यावेळी अनेक प्रकल्पांच्या परवानग्या रखडल्या. त्यामुळे नवे प्रोजेक्ट लाँच होवू शकले नाहीत. त्यात जवळपास 33 टक्के घट झाली आहे. या शिवाय घरांच्या वाढलेल्या किंमतीचा परिणामही गृह विक्रीवर झाल्याचे  प्रॉपटायगर डॉटकॉमच्या ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शियल: अॅन्युअल राऊंडअप 2024' या अहवालात म्हटले आहे. दरम्यान महाराष्ट्राचा भारताच्या रेसिडेन्शियल मार्केटमध्ये मोठा वाटा आहे. त्यामुळे देशाच्या आकडेवारीत देखील ही घट झालेली दिसते. या अहवाला नुसार गेल्या वर्षा याच कालावधीत तुलनेत एनसीआर वगळता देशभरात घरांच्या विक्रीत घट झाली आहे.

ट्रेंडिंग बातमी - Honor killing: जळगावमध्ये सैराट! 3 वर्षानंतर जावयाचा बापा समोरच मुडदा पाडला, गर्भवती मुलीवरही...

ऑक्टोबर-डिसेंबर या सणासुदीच्या काळात  मागील तिमाहीच्या तुलनेत अपेक्षेप्रमाणे घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. पण  विक्री आणि नवीन लॉन्चिंग या दोन्ही बाबतीत मागील वर्षाच्या या काळाशी तुलना केल्यास बहुतांशी भागांमध्ये घट झाल्याचेच दिसून येते. असं हाऊसिंग डॉटकॉम आणि प्रॉपटायगर डॉटकॉमचे सीईओ ध्रुव अग्रवाल यांनी सांगितले. जागतिक आर्थिक अनिश्चितता, मुख्य राज्यांमधील निवडणुका आणि देशभरात मालमत्तेच्या किंमतीत झालेली वाढ, या घटकांमुळे विकासक आणि खरेदीदार या दोघांनी थांबा आणि पाहा असे धोरण स्विकारल्याचे दिसते असं ही ते सांगतात.

ट्रेंडिंग बातमी -  त्या हॉटेलच्या किचनमध्ये शिजत होतं चिकन, अन् बाहेरच्या टेबलावर संतोष देशमुखांच्या हत्येचा कट

या कालावधीत मुंबई MMR मध्ये 33 हजार 617 घरांची विक्री करण्यात आली आहे. इतर शहरांच्या तुलनेत त जास्त आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत ही विक्री कमी झाली आहे. गेल्या हाच आकडा जवळपास 48 हजार 553 इतका होता. याचा अर्थ की घरांच्या विक्रीत जवळपास 31 टक्के घट झाली आहे. पुण्यात 18 हजार 240 घरांची विक्री या कालावधीत झाली आहे. त्यातही जवळपास गेल्या वर्षीच्या तुलनेत 31 टक्के घट असल्याचे स्पष्ट झालं आहे.   

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - पुण्यातील बहीण- भावाचा हॉटेलमध्ये मृतदेह, आत्महत्या की घातपात? चिठ्ठीतून शॉकिंग खुलासा

 2024 वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) देशातील सर्वात मोठ्या आठ हाऊसिंग मार्केट्समध्ये नवीन घरांच्या लॉन्चिंगमध्ये वार्षिक 33% घट झाली आहे. हैदराबादमध्ये सर्वात जास्त घट झाली असून केवळ 9066 घरे लॉन्च झाली आहेत.  ही घट 66% येवढी आहे.  त्या पाठोपाठ अहमदाबादेत 3515 घरे (61% घट) आणि कोलकाता येथे 3091 घरे (41% घट) लॉन्च झाली आहेत. सकारात्मक बाजू ही आहे की, दिल्ली एनसीआरमध्ये 10048 घरांच्या लॉन्चिंगसह वार्षिक 133% वाढ झाली आहे. चेन्नई येथे 4005 घरांसह 34% वाढ आणि बंगळूर येथे 15157 घरांसह वार्षिक 20% वाढ झाल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.