स्वानंद पाटील, प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण केवळ राज्यभरात नाही तर देशभरात गाजलं. सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय निर्घृणपणे अमानवीय पद्धतीने (Massajog Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) करण्यात आली होती. 6 डिसेंबरला झालेल्या आवादा कंपनीच्या स्टोर यार्डवरील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली. यानंतर 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. टोल नाक्यावरून देशमुख यांचे अपहरण करण्यात आले, त्यानंतर त्यांना जबर मारहाण देखील करण्यात आली होती. ही मारहाण इतकी भयानक होती की त्यांच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या. मात्र आता या प्रकरणाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणाचा कट रचला गेला तो मसाजोगच्या पुढे असलेल्या एका धाब्यावर.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देशमुख यांची हत्या करण्याआधी एक दिवस आरोपींनी बीड अंबाजोगाई महामार्गावरील तिरंगा हॉटेलवर जेवण केल्याचं समोर आले आहे. त्यामुळे याच हॉटेलवर देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याच उघड होत आहे. तपास यंत्रणेने हॉटेल मालकाची चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र हॉटेल तिरंगाच्या सीसीटीव्हीत केवळ 20 दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज हे तपास यंत्रणा मिळाल्याचे समजते आहे. दरम्यान याच तिरंगा हॉटेलवर आरोपींनी 8 डिसेंबर रोजी हॉटेलवर जेवण केलं. या जेवणासाठी त्यांनी चिकन हंडीची ऑर्डर दिल्याची माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा - Beed Crime : संतोष देशमुखांपूर्वी आवादा कंपनीच्या मॅनेजरचंही केलं होतं अपहरण; बीड खंडणी प्रकरणात मोठी अपडेट
एकीकडे आरोपींनी ऑर्डर केलेलं चिकन या ढाब्याच्या किचनमध्ये शिजत असतानाच दुसरीकडेचा याच हॉटेलच्या टेबलावर बसून आरोपीकडून संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट शिजत होता. आरोपींनी चिकनवर ताव मारल्यानंतर ते केजच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान आरोपींची ही माहिती मिळाल्यानंतर तपास यंत्रणेने या ठिकाणी भेट देऊन पुढील तपास सुरू केल्याचे समजते. तपास यंत्रणेला योग्य ते सहकार्य केल्याचे हॉटेल मालकाने सांगितले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world