जाहिरात

FDA Action: मुंबईतील प्रसिद्ध 'रुस्तम आईस्क्रीम'ला FDAने ठोकले टाळे! तपासणीदरम्यान दुकानात काय आढळलं?

FDA action against Rustom Ice Cream: मुंबईतील चर्चगेट भागातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक 'रुस्तम आईस्क्रीम' पार्लरला टाळे ठोकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

FDA Action: मुंबईतील प्रसिद्ध 'रुस्तम आईस्क्रीम'ला FDAने ठोकले टाळे! तपासणीदरम्यान दुकानात काय आढळलं?

दक्षिण मुंबईतील चर्चगेट परिसरातील आईस्क्रीमप्रेमींचे अत्यंत लाडके आणि ऐतिहासिक ठिकाण असलेले 'रुस्तम आईस्क्रीम' सध्या मोठ्या वादात सापडले आहे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) या प्रसिद्ध आईस्क्रीम पार्लरचा परवाना तातडीने निलंबित करून दुकान बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दुकानात अस्वच्छता, उंदरांचा सुळसुळाट आणि कालबाह्य फ्लेवरिंग एजंट्सचा वापर होत असल्याचा धक्कादायक खुलासा एफडीएच्या कारवाईत झाला आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात 'सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र' ही मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत रुस्तम आईस्क्रीम पार्लरवर ही अचानक धाड टाकण्यात आली होती.

कारवाईदरम्यान एफडीएला काय आढळले?

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नामांकित आईस्क्रीम पार्लरमध्ये अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. तपासणी पथकाला आईस्क्रीम पार्लरच्या आवारात जिवंत उंदीर आणि माश्या फिरताना आढळल्या, ज्यामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

(नक्की वाचा-  Marathwada News: जमिनीतून मोठा गूढ आवाज अन् हादरे; नागरिकांची मध्यरात्री पळापळ, 3 जिल्ह्यांमध्ये खळबळ)

कोल्ड चेनचा अभाव

आईस्क्रीम साठवण्यासाठी आवश्यक असलेली 'कोल्ड चेन' आणि योग्य तापमान राखण्यात हे दुकान पूर्णपणे अपयशी ठरले होते. दुकानातून पिस्ता, अननस, स्ट्रॉबेरी, ब्लॅक करंट आणि रम जमैका यांसारखे अनेक कालबाह्य झालेले कृत्रिम फ्लेवर्स आणि एसेन्स जप्त करून ते जागेवरच नष्ट करण्यात आले.

FSSAI नियमांचे उल्लंघन; फॅटचे प्रमाण कमी

एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी एका बाह्य प्रयोगशाळेच्या अहवालात रुस्तमच्या आईस्क्रीममध्ये 7.94% फॅट आढळून आले होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या FSSAI नियमांनुसार, दर्जेदार आईस्क्रीममध्ये किमान 10% फॅट असणे बंधनकारक आहे. त्यामुळे हे आईस्क्रीम निकषांपेक्षा कमी दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लॅब रिपोर्ट येईपर्यंत दुकान बंद राहणार

एफडीएने आईस्क्रीमचे अधिकृत नमुने गोळा करून ते शासकीय प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले आहेत. "स्वच्छतेच्या गंभीर त्रुटींमुळे रुस्तम आईस्क्रीमचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. जोपर्यंत अन्न चाचणी प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल येत नाही, तोपर्यंत हे प्रतिष्ठान पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत."
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com