मुंबई, कोल्हापूर ते बारामती.... अजित पवारांची 1000 कोटींची मालमत्ता मुक्त

2021 मध्ये बेनामी संपत्ती प्रकरणी प्राप्तिकर विभागाने अजित पवार, त्यांचा मुलगा पार्थ पवार आणि पत्नी सुमित्रा पवार यांची मालमत्ता जप्त केली होती.  बेहिशोबी संपत्ती आणि करचुकवेगिरीच्या आरोपांवरून आयकर विभागाने ही कारवाई केली होती. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना बहिशेबी मालमत्ता प्रकरणी दिलासा मिळाला आहे. जवळपास 1000 कोटींचा मालमत्ता आयकर विभागाने मुक्त केला आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट, निर्मल टॉवर, पुण्यातील जमीन, कोल्हापूरमधील इतर मालमत्ता, तसेच काही वेगवेगळ्या भागांतील मालमत्ता अजित पवार आणि कुंटुबीयांना पुन्हा मिळणार आहेत. 

(नक्की वाचा- शपथविधीच्या दुसऱ्याचा दिवशी अजित पवारांना मोठा दिलासा; आयकर विभागाकडून पवार कुटुंबीयांची मालमत्ता मुक्त)

कोणत्या मालमत्ता मुक्त करण्यात आल्या?

  • नरिमन पॉइंट, मुंबई येथील निर्मल टॉवरमधील व्यावसायिक जागा ज्याची अंदाजे किंमत जवळपास 300-400 कोटी रुपये आहेत. 
  • पुण्यातील बारामतीसह इतर काही ठिकाणच्या काही जमिनी आहेत, ज्याची किंमत 200-300 कोटी रुपये आहे. 
  • विविध शहरांमध्ये गोदामे आणि व्यावसायिक मालमत्ता आहेत ज्याची किंमत 150-200 कोटी रुपये आहेत. 
  • कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांतील इतर ठिकाणी शेतीसाठी आणि व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनी आहेत, ज्याची किंमत अंदाजे 100 कोटींच्या घरात आहे. 

2021 मध्ये बेनामी संपत्ती प्रकरणी प्राप्तिकर विभागाने अजित पवार, त्यांचा मुलगा पार्थ पवार आणि पत्नी सुमित्रा पवार यांची मालमत्ता जप्त केली होती.  बेहिशोबी संपत्ती आणि करचुकवेगिरीच्या आरोपांवरून आयकर विभागाने ही कारवाई केली होती. 

(नक्की वाचा: प्रेमविवाह, वाद अन् भयंकर शेवट! पत्नीने नवऱ्याला संपवलं; हत्येनंतर पोलिसांना फोन केला अन्)

दिल्ली लवादानच्या निर्णयाला आयकर विभाग उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. आयकर विभागने निर्णयाला आव्हान दिल्यास सर्व मालमत्ता परत करण्याच्या प्रक्रियेला उशीर होऊ शकतो. मात्र लवादाच्या निर्णयाला आव्हान दिलं गेलं नाही तर अजित पवार आणि कुटुंबियांना त्यांचा मालमत्ता काही आठवड्यात मिळू शकते. 

Topics mentioned in this article