रिझवान शेख, प्रतिनिधी
Mumbai Kutumbsakhi Hotel News : इराण युद्धाचे चटके एलपीजी गॅस सिलिंडर पुरवठ्याला बसले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरातली हॉटेल व्यवसायीक अडचणीत सापडले आहेत. मुंबईतील कुटुंबसखी हॉटेल व्यावसायिकांनाही याचा फटका बसला आहे. कुटुंबसखी सहकारी औद्योगिक उत्पादन संस्थेच्या गरजू महिला उद्योजकांना देखील गॅस मिळत नसल्याने त्यांना आर्थिक नुकसानाला समोरं जावं लागत आहे.
मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या कुटुंब सखी या गरजू महिला उद्योजकांच्या स्टॉलला देखील गॅसचा पुरवठा होत नाही. दररोज 10 महिला कर्मचारी या कुटुंब सखी स्टॉलमध्ये काम करत असतात.याआधी त्यांच्या स्टॉलमध्ये असलेला मेनू हा मोठ्या प्रमाणात असायचा. मात्र आता गॅस नसल्याने मेनूमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. गॅस नसल्याने चहा बनवला जात नाही. दररोजच्या कमाईवर याचा परिणाम होत आहे. पुढेही अशीच परिस्थिती राहिली तर काही दिवसांनी हॉटेल बंद करावी लागतील, असं व्यवसायीकांचं म्हणणं आहे.
नक्की वाचा >> Baramati News: अजित पवारांच्या बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? 'या' समाजातील नेते निवडणूक लढवण्यावर ठाम
या हॉटेलवर 100 हून अधिक महिलांचा उदरनिर्वाह
कुटुंबसखीच्या मुंबईत चार ते पाच ब्रान्चेस आहेत. यामध्ये 100 हून अधिक महिला काम करतात. कुटुंबसखी या हॉटेवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. दिवसाला 20 ते 25 हजार रुपये एका स्टॉलवर कमावतात. पण एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवड्यामुळे आता दिवसाला फक्त तीन ते चार हजार रुपयांची कमाई होते.याच हॉटेलवर सर्व महिलांचा उदहनिर्वाह चालतो.
नक्की वाचा >> Navi Mumbai: थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी नवी मुंबई महापालिका ACTION मोडवर, 'या' ठिकाणी केली मोठी कारवाई
"एलपीजी सिलेंडर तुटवड्यामुळे अनेक लोक इंडक्शनपर शिफ्ट झालेले आहे. आम्ही देखील इंडक्शन घ्यायला गेलो होतो. परंतु मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे इंडक्शन गॅस देखील आम्हाला मिळत नाहीय. राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला जे पंधराशे रुपये येत होते, ते सुद्धा बंद झाले आहेत",अशी प्रतिक्रिया या महिलांनी दिली आहे.