जाहिरात

रेल्वे प्रवाशांना आधी झटका मग दिलासा! 1 जूनपासून लागू होणारा 'तो' वादग्रस्त नियम अचानक स्थगित; नेमकं काय घडलं

Central Railway Food Price Hike Stay: मध्य रेल्वेने 1 जून 2026 पासून स्थानकांवरील वडापावसह अन्य खाद्यपदार्थांचे दर वाढवण्याचा निर्णय अचानक स्थगित केला आहे.

रेल्वे प्रवाशांना आधी झटका मग दिलासा! 1 जूनपासून लागू होणारा 'तो' वादग्रस्त नियम अचानक स्थगित; नेमकं काय घडलं
"Central Railway Food Price Hike Stay: मध्य रेल्वेकडून प्रवाशांना दिलासा"
Canva

- जुई जाधव, प्रतिनिधी

Central Railway News: मध्य रेल्वेच्या (Central Railway) स्थानकांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे स्थानकांवरील 'मायनर स्टॅटिक कॅटरिंग युनिट्स'मध्ये (खाद्यपदार्थांचे स्टॉल्स) विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दरवाढीचा निर्णय रेल्वे प्रशासनाने तात्पुरता स्थगित केला आहे. रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ही प्रस्तावित दरवाढ पुढील आदेश येईपर्यंत लागू केली जाणार नाही.

20 रुपयांचा वडापाव आता 13 रुपयांनाच मिळणार!

यापूर्वी मध्य रेल्वेने खाद्यपदार्थांचे दर वाढवण्याचे संकेत दिले होते, ज्यानुसार स्थानकांवर मिळणाऱ्या वडापावची किंमत वाढणार होती. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आल्यामुळे 1 जूनपासून जो वडापाव 20 रुपयांना मिळण्याची शक्यता होती, तो आता जुन्याच दरात म्हणजेच अवघ्या 13 रुपयांमध्ये प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. मुंबईकरांचा आणि रेल्वे प्रवाशांचा हक्काचा नाश्ता असणारा वडापाव महाग होणार नाही, हे स्पष्ट झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

(नक्की वाचा : भारतात Ebola Virusची एण्ट्री? युगांडाहून बंगळुरूत आलेल्या महिलेमध्ये आढळली ही लक्षणे; रक्ताचे नमुने पाठवले पुण्यात)

मध्य रेल्वे कार्यालयाने 25 मे 2026 रोजी एक परिपत्रक जारी करून खाद्यपदार्थांच्या दरांमध्ये सुधारणा (दरवाढ) करण्याची घोषणा केली होती. हा नवीन नियम 1 जून 2026 पासून लागू होणार होता. पण सर्वसामान्य प्रवाशांचे हित आणि विविध स्तरांतून व्यक्त होणारी नाराजी लक्षात घेता, प्रशासनाने या निर्णयाला तूर्तास ब्रेक लावला आहे.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Central Railway

(नक्की वाचा : Heatwave Alert: भारतात 47°C उष्ण तापमानाचे तांडव, महिलांपेक्षा पुरुषांना सर्वाधिक धोका? समोर आलं मुख्य कारण)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Echion

सर्व विभागांना सूचना जारी

मध्य रेल्वे प्रशासनाने या नव्या स्थगितीच्या आदेशाबाबत रेल्वेच्या संबंधित सर्व विभागांना तातडीने सूचना देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 1 जूनपासून स्थानकांवरील कोणत्याही स्टॉलवर प्रवाशांकडून वाढीव दर आकारले जाणार नाहीत. पुढील नवीन आदेश येईपर्यंत स्थानकांवर जुन्याच दरांचे मेनूकार्ड आणि दरपत्रक लागू राहणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com