Mumbai-Mandwa Ro-Ro Ferry Fare Hike: आखाती देशांतील वाढत्या राजकीय आणि लष्करी तणावाचा परिणाम आता थेट मुंबईकरांच्या प्रवासावर होताना दिसत आहे. जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर वधारल्यामुळे मुंबई-मांडवा रो-रो सेवा आणि पारंपरिक लाकडी फेरीबोटी चालवणाऱ्या कंपन्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परिणामी, ही सेवा सुरू ठेवण्यासाठी भाडेवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे संकेत मिळत आहेत.
सागरी वाहतूक अडचणीत
मुंबईतील रस्ते आणि रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी सागरी मार्ग हा सर्वात सोयीचा पर्याय ठरला आहे. विशेषतः अलिबागकडे जाणाऱ्यांसाठी रो-रो सेवा 'लाइफलाइन' बनली आहे. मात्र, इंधन दरवाढीमुळे या सेवेचा खर्च आता आवाक्याबाहेर जात आहे.
(नक्की वाचा- DMart VIDEO: डीमार्टमध्ये जात असाल तर सतर्क राहा! एक चूक महागात पडेल)
इंधन वापराचे गणित
- रो-रो बोट (एक फेरी) - सुमारे 200 लिटर इंधन लागते.
- पारंपरिक फेरी - एका फेरीसाठी 30 ते 50 लिटर डिझेल लागते.
- परिणाम - इंधन दरातील वाढीमुळे ऑपरेशनल खर्च प्रचंड वाढला असून भाडेवाढ अपरिहार्य ठरत आहे.
मुंबईतील फेरीबोटींची सद्यस्थिती
मुंबईतील विविध बंदरांवरून 150 हून अधिक नोंदणीकृत फेरीबोटी कार्यरत आहेत. गेटवे ऑफ इंडिया येथे 86 फेरीबोटी, भाऊचा धक्का (M2M Ferries) 24 फेरीबोटी, बेलार्ड पिअर येथे 40 फेरीबोटी धावतात. 150 हून अधिक बोटी रेवस, उरण, मोरा, एलिफंटा आणि मांडवा मार्गावर धावतात.
(नक्की वाचा- IPL 2026: रोहित, रिकल्टन, पुरनने सामना गाजवला; चर्चा रघु शर्माच्या चिठ्ठीची, मजकूर वाचून सगळेच भावुक)
प्रवाशांवर काय परिणाम होईल?
इंधन दरवाढीमुळे संबंधित कंपन्यांकडून लवकरच नवीन भाडेदर जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे केवळ पर्यटकांनाच नाही, तर दररोज कामासाठी ये-जा करणाऱ्या सामान्य प्रवाशांनाही महागाईची झळ सोसावी लागेल.