Mumbai Mayor News: 44 वर्षांनंतर मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर होणार विराजमान, रितू तावडे रचणार इतिहास

Mumbai Mayor News: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे. ही निवड बिनविरोध होणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"BJP Mayoral Candidate Ritu Tawde: रितू तावडे रचणार इतिहास"

Mumbai Mayor News: मुंबई महानगरपालिकेत बुधवारी (11 फेब्रुवारी) एक नवा इतिहास रचला जाणार आहे. तब्बल 44 वर्षांनंतर भाजपाचा दुसरा महापौर मुंबईच्या महापौरपदी विराजमान होत आहे. रितू तावडे यांची महापौरपदी तर शिवसेनेचे (शिंदे गट) संजय घाडी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कारण विरोधी पक्षाच्या वतीने कोणीही अर्ज दाखल केलेले नाही. या निवडीसोबतच पालिकेवर असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे.

महायुतीने असा राखला सत्तेचा समतोल

2026च्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेच्या महायुतीने मोठे यश संपादन केले. संख्याबळ जास्त असल्याने भाजपने महापौरपदावर आपला हक्क सांगितला, तर शिंदेसेनेनेही या पदासाठी आग्रह धरला होता. पण अखेर समन्वयाने भाजपला महापौरपद आणि शिंदेसेनेला उपमहापौरपद देण्याचे ठरले. रितू तावडे या पूर्व उपनगरातून तर संजय घाडी हे पश्चिम उपनगरातून निवडून आले असल्याने सत्ताधाऱ्यांनी मुंबईच्या दोन्ही उपनगरांना सत्तेत समान प्रतिनिधित्व दिले आहे. नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार आणि  मंगलप्रभात लोढा पालिका मुख्यालयात उपस्थित राहणार आहेत.

(नक्की वाचा: Kalyan News: 'तुमचे ते चंद्रपूर ,आमचे ते डोंबिवली ? वाह रे वाह!', मनसेने ठाकरे सेनेला डिवचले)

44 वर्षांचा वनवास संपला

यापूर्वी 1982मध्ये प्रभाकर पै हे भाजपचे पहिले महापौर झाले होते. त्यानंतर प्रदीर्घ काळानंतर भाजपला हे पद मिळाले आहे. वर्ष 2017 मध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र होते, पण नंतर या पक्षांमध्ये काडीमोड झाला. आता 2026 मध्ये पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीने पालिकेवर झेंडा फडकावला आहे.

Advertisement

(नक्की वाचा: Ritu Tawde Mumbai Mayor Candidate: मुंबईच्या संभाव्य महापौर रितू तावडेंची संपत्ती आणि शिक्षण किती?)

प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे

ही निवडणूक 'महापौर हिंदू मराठी की मराठी' या मुद्यावरून चांगलीच गाजली. सुरुवातीला भाजपने 'हिंदू मराठी' महापौराची भूमिका घेतली होती, तर उद्धवसेनेने 'मराठीच महापौर' यावर भर दिला होता. पुढे भाजपनेही मराठी महापौराचाच प्रचार केला. काँग्रेस, मनसे, सपा, एमआयएम या विरोधी पक्षांनी कोणताही उमेदवार उभा न केल्याने ही प्रक्रिया बिनविरोध पार पडत आहे.

Advertisement