जाहिरात
This Article is From Feb 10, 2026

Kalyan News: 'तुमचे ते चंद्रपूर ,आमचे ते डोंबिवली ? वाह रे वाह!', मनसेने ठाकरे सेनेला डिवचले

ठाकरेंच्या पाठिंब्यावर भाजपाच्या महापौर चंद्रपूरमध्ये बसला आहे.

Kalyan News: 'तुमचे ते चंद्रपूर ,आमचे ते डोंबिवली ? वाह रे वाह!', मनसेने ठाकरे सेनेला डिवचले
कल्याण:

अमजद खान 

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गट आणि मनसे एकत्र आले. गट स्थापने वेळी दोघांच्या नगरसेवकांचा मिळून गट स्थापन झाला. यानंतर मनसे नेते राजू पाटील यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून सडकुन टीका करण्यात आली. संजय राऊत यांनी ही मनसेवर टीका केली. राजू पाटील यांनी शिवसेना शिंदे गटासोबत युती का केली? याचे अनेक तर्क लावले गेले. मात्र आपण विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवून शिवसेना शिंदे गटासोबत गेल्याचे राजू पाटील यांनी त्याच वेळी स्पष्ट केले होते. आता शिवसेना ठाकरे गटाने चंद्रपूरमध्ये थेट भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यावरून पाटील यांनी ठाकरे गटाला डिवचले आहे.  

नक्की वाचा - Dombivali News: 'धुरंधर'चं शुटींग ज्या पुलावर झालं, तो माणकोली पुल पुन्हा चर्चेत, यावेळी कारण काय?

निवडणुकीनंतर लगेचच मनसेने कल्याण डोंबिवलीत शिंदेंना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे अनेकांच्या भूवया त्यावेळी उंचावल्या होत्या. निवडणुकीत मनसे शिवसेना ठाकरे गटासोबत होती. पण निवडणुकीनंतर त्यांनी थेट शिंदे गटालाच पाठिंबा दिला होता. त्यामुळे हा मुद्दा राज्याच्या राजकारणा केंद्रस्थानी राहीला. त्यावर टिका ही झाली. ठाकरे गटाने तर राजू पाटील यांना लक्ष केले होते. आता चंद्रपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाने भाजपाला पाठिंबा दिला आहे.  

नक्की वाचा - Dombivali news: बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला, तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू

ठाकरेंच्या पाठिंब्यावर भाजपाच्या महापौर चंद्रपूरमध्ये बसला आहे. ही संधी मनसे नेते राजू पाटील यांनी साधली आहे. राजू पाटील यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर आपली भावना व्यक्त केली आहे. त्या ते म्हणतात तुमचे ते चंद्रपूर ,आमचे ते डोंबिवली ? वाह रे वाह अशी पोस्ट त्यांनी केली आहे. ही पोस्ट करताना त्यांनी संजय राऊत यांना टॅग केले आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात पुन्हा एकदा जुंपली आहे. मनसेने केलेल्या या टिकेला आता शिवसेना ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com