Mumbai News : मुंबईत मेट्रोचं जाळं 120 KM पर्यंत पसरणार, 'ही' स्थानके होणार सुुरू, वाचा संपूर्ण यादी

मुंबई शहर आता अधिक वेगवान आणि मेट्रोमय होणार आहे. मुंबईत सध्या 90 किमीपर्यंत मेट्रोचं जाळं पसरलं आहे. परंतु, 2026 पर्यंत 120 किमीचा टप्पा पार करण्यात येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Metro New Stations
मुंबई:

Mumbai Metro Latest News :  मुंबई शहर आता अधिक वेगवान आणि मेट्रोमय होणार आहे. मुंबईत सध्या 90 किमीपर्यंत मेट्रोचं जाळं पसरलं आहे. परंतु, 2026 पर्यंत 120 किमीचा टप्पा पार करण्यात येणार आहे. मीरा-भाईंदरमधील रेड लाईन 9 मधील काही स्थानके आणि पूर्व उपनगरातील लाईन 2 बी मधील काही स्थानके या आठवड्यात सुरू होत आहेत.तसेच पॅाड टॅक्सीचे भूमिपुजन करण्यात येणार आहे  2026 या वर्षभरात जवळपास 40 ते 50 किमीचे नवीन मेट्रो मार्ग टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होतील. सध्या शहरात 80 किमीचे जाळे सात कॉरिडॉरवर पसरलेले आहेत. ज्यामध्ये 2024-25 दरम्यान टप्प्याटप्प्याने सुरू झालेल्या अ‍ॅक्वा लाईन (लाईन 3) या पहिल्या भूमिगत मेट्रोचाही यात समावेश आहे.

लवकरच सुरू होणारे प्रमुख मार्ग

1) रेड लाईन 9 (दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर)

एकूण स्थानके (8): दहिसर,पांडुरंग वाडी,मिरागाव,काशिगाव,साई बाबा नगर, मेडीतिया नगर,शहीद भगतसिंग गार्डन,सुभाषचंद्र बोस स्टेडियम.
लांबी : 10.4 किमी.

सद्यस्थिती: पूर्ण कॉरिडॉर 2026 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. फेज 1 (दहिसर ते काशिगाव) उद्घाटनासाठी सज्ज आहे. तर फेज 2 पुढील सहा महिन्यांत सुरू होऊ शकतो.

Advertisement

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याण रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर संतापजनक प्रकार, ये-जा करणाऱ्या प्रवाशांमध्ये घबराट, VIDEO

ग्रीन लाईन 4 ए (कासारवडवली ते गायमुख)
स्थानके: गोवनीवाडा आणि गायमुख.
लांबी: 2.7 किमी.
सद्यस्थिती: पूर्ण कॉरिडॉर 2026 मध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता.

मुंबई मेट्रोचा प्रवास हा आरामदायी वातानुकूलित आणि पर्यावरण पुरक आहे दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या वस्तीतुन ॲक्वालाईन थेट भाईंदर पर्यंत जोडली जात आहे. मेट्रो मार्गांची नावे आणि त्यांची सुरुवातीची व शेवटची स्थानके

नक्की वाचा >> Pune News: पुण्यात कार खरेदी करताना सावध राहा, ग्राहकांची होतेय फसवणूक; पोलिसांनी चाकणमध्ये टोळीला पकडलं

  • मेट्रो लाईन 1 (ब्लू लाईन): वर्सोवा ते घाटकोपर
  • मेट्रो लाईन 2A (यलो लाईन): दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पश्चिम)
  • मेट्रो लाईन 2B (यलो लाईन): डी.एन. नगर ते मंडाले
  • मेट्रो लाईन 3 (ॲक्वा लाईन): कफ परेड ते आरे जे.व्ही.एल.आर.
  • मेट्रो लाईन 4 (ग्रीन लाईन): वडाळा ते कासारवडवली (ठाणे)
  • मेट्रो लाईन 5 (ऑरेंज लाईन): ठाणे ते कल्याण
  • मेट्रो लाईन 6 (पिंक लाईन): स्वामी समर्थ नगर (लोखंडवाला) ते विक्रोळी (ईईएच)
  • मेट्रो लाईन 7 (रेड लाईन): दहिसर (पूर्व) ते गुंदवली (अंधेरी पूर्व)
  • मेट्रो लाईन 7A (रेड लाईन): गुंदवली ते सीएसएमआय विमानतळ (CSMIA)
  • मेट्रो लाईन 9 (रेड लाईन): दहिसर (पूर्व) ते मीरा भाईंदर
  • मेट्रो लाईन 10 (ग्रीन लाईन): गायमुख (ठाणे) ते शिवाजी चौक (मीरा रोड)
  • मेट्रो लाईन 11 (ग्रीन लाईन): वडाळा ते सीएसएमटी (CSMT)
  • मेट्रो लाईन 12 (ऑरेंज लाईन): कल्याण ते तळोजा