Kalyan Skywalk Video Viral : कल्याण रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर दोन जणांनी चक्क दुचाकीने प्रवास केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.कल्याण पूर्वेतील स्कायवॉकचा हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. अनेक प्रवासी स्कायवॉकवरून येजा करत असतात. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीमुळे या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत विशेष करुन स्टेशन परिसरात गर्दी असल्याने लोकांना व्यवस्थित चालता येत नाही. कल्याण पूर्वेत तर काही वर्षापूर्वी दयनीय अवस्था होती.थेट रेल्वे यार्डाला आणि रूळाला क्रास करुन प्रवासी आणि पादचारी यांना स्टेशन गाठावे लागत होते.रेल्वे प्रशासन आणि महापालिका यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून स्कायवॉक तयार केला. त्यावरून लाखो प्रवासी आणि पादचारी येजा करतात.लोकांना चालण्यासाठी स्कायवॉक आहे.परंतु,दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीमुळे कायद्याचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत.
नक्की वाचा >> Ravindra Chavan: भाजपला 46 वर्षे पूर्ण, रविंद्र चव्हाणांचं मोठं विधान, म्हणाले, "त्यांच्या रक्ता-घामाने.."
तिकीट घेण्यासाठी दोघे दुचाकीवरून स्कायवॉकवर आले अन्..
मात्र सोशल मिडियावर व्हायरल झालेला अत्यंत धक्कादायक आहे. चक्का स्कायवॉक वर दोन दुचाकी स्वार त्यांची दुचाकी घेऊन चालवित आहे. तिकीट घेण्यासाठी हे दोघे कल्याण पूर्वेतील स्कायवॉकच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेल्याचे बोलले जात आहे.दुचाकीस्वारांच्या या बेकायदेशीर कृत्याला आळा घालणे गरजेचं आहे. प्रशासन त्यांच्या विरोधात कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यात कार खरेदी करताना सावध राहा, ग्राहकांची होतेय फसवणूक; पोलिसांनी चाकणमध्ये टोळीला पकडलं
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world