Mumbai Metro : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMRCL) दक्षिण मुंबईतील वाहतूक समस्या सोडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे सादर केला आहे. मुंबई मेट्रो रेलने नवीन भुयारी मेट्रो लाइन 11 मार्गासाठी आहे प्रस्ताव दिला आहे. जो 17.5 किलोमीटर लांबीचा असेल तो अनिक डेपोपासून (Anik Depot) गेटवे ऑफ इंडियापर्यंत (Gateway of India) जोडला जाईल.
मुंबई मेट्रो रेलने सादर केलेल्या प्रकल्प अहवालानुसार, या मार्गावर एकूण 13 स्थानके असतील, त्यापैकी अनिक डेपो वगळता बाकीची 12 स्थानके भुयारी असतील. हा मार्ग नागपाडा आणि भेंडी बाजारसारख्या दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या आणि दाट लोकवस्तीच्या भागातून जाणार आहे.
(नक्की वाचा- Tesla India launch : टेस्लाच्या भारतातील पहिल्या शोरुमचं आज मुंबईत उद्घाटन, CM फडणवीसांची उपस्थिती)
नवीन लाईन 4 (वडाळा - घाटकोपर - ठाणे - कासारवडवली), अॅक्वा लाईन (लाईन 3 - कफ परेड - बीकेसी - आरे जेव्हीएलआर), मोनोरेल आणि भायखळा आणि सीएसएमटीसारख्या उपनगरीय रेल्वे स्थानकांशी जोडली जाईल. यामुळे प्रवाशांना सहजपणे प्रवास करता येईल.
16 हेक्टर जागेत अनिक-प्रतिक्षा नगर बीईएसटी बस डेपो येथे मेट्रोचा डेपो प्रस्तावित करण्यात आला आहे, ज्यामुळे मेट्रोला सध्याच्या बस वाहतूक पायाभूत सुविधांशी जोडणे शक्य होईल. प्रस्तावित 13 भुयारी स्थानकांपैकी 8 स्थानके 'कट अँड कव्हर' पद्धतीने, तर उर्वरित 5 स्थानके 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड' वापरून बांधली जातील.
( नक्की वाचा: 'धनुष्यबाण' चिन्ह शिंदेंना आणि 'शिवसेना' पक्ष ठाकरेंना मिळणार? )
एमएमआरसीएलच्या अंदाजानुसार, 2031 पर्यंत दररोज 5,80,000 प्रवासी या मार्गाचा वापर करतील आणि 2041 पर्यंत ही संख्या 869,000 पर्यंत पोहोचेल. सध्या हा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या विचाराधीन आहे. एकदा राज्याची मंजुरी मिळाल्यावर, तो केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाईल.