मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई मेट्रोच्या लाईन 2A आणि 7 वर काही तांत्रिक बदलांमुळे सेवांमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. यामुळे दैनंदिन प्रवासासाठी मेट्रोचा वापर करणाऱ्या प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
प्रवाशांच्या सुरक्षेला आणि सोयीला प्राधान्य देत मेट्रो प्रशासनाने हे बदल लागू केले आहेत. प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन मेट्रोकडून करण्यात आले आहे.
मेट्रो सेवांमध्ये नेमके काय बदल झाले?
मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर काही विशेष बदल करण्यात आले आहेत.
- लाईन 2A (Line 2A): या मार्गावरील सेवा अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्वपर्यंत दोन्ही लाईन्सवर नेहमीप्रमाणे सुरू आहेत.
- शॉर्ट लूप सर्व्हिस : गुंडावली आणि आरे दरम्यान 'शॉर्ट लूप सर्विस' सुरू करण्यात आली आहे. याचा अर्थ, या दोन स्थानकांदरम्यान गाड्या मर्यादित अंतरासाठी धावतील.
- सिंगल लाईन ऑपरेशन : ओव्रीपाडा आणि आरे दरम्यान दोन्ही मार्गांवर फक्त एकाच लाईनवर वाहतूक सुरू आहे.
तांत्रिक कारणांमुळे हे बदल करण्यात आले असून, प्रवाशांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मेट्रो मार्गावरील या बदलांमुळे विशेषतः ज्या प्रवाशांना गुंडावली, आरे आणि ओव्रीपाडा या स्थानकांदरम्यान प्रवास करायचा आहे, त्यांना थोडा विलंब होऊ शकतो.
मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात असून, परिस्थिती पूर्ववत झाल्यावर नेहमीप्रमाणे सेवा पूर्ववत केली जाईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.