जाहिरात

Mumbai Monsoon: मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार! पुढच्या आठवड्यात मुंबईत मान्सूनचे आगमन

Mumbai Monsoon: मुंबईकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. पुढच्या आठवड्यात मुंबईत मान्सून दाखल होणार असून, हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार 8 ते 11 जूनदरम्यान मान्सून मुंबईत पाऊल ठेवेल.

Mumbai Monsoon: मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार! पुढच्या आठवड्यात मुंबईत मान्सूनचे आगमन

Mumbai Monsoon : उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी अत्यंत सुखद बातमी समोर आली आहे. मुंबईत पुढच्या आठवड्यात मान्सून दाखल होण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, 8 ते 11 जूनदरम्यान मान्सून मुंबईत अधिकृतपणे दाखल होणार आहे. मान्सूनची अरबी समुद्रातील प्रगती योग्य दिशेने सुरू असून, यामुळे मुंबईकरांना लवकरच उकाड्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे.

7 ते 8 जूनला दक्षिण कोकणात होणार आगमन

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून पुढे सरकण्यासाठी सध्या अरबी समुद्र आणि लगतच्या भागात अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे. जर हे पोषक वातावरण असेच टिकून राहिले, तर 7 किंवा 8 जून रोजी मान्सून दक्षिण कोकणात दाखल होईल. या मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे 6 ते 8 जूनदरम्यान संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या घाट भागात पावसाच्या प्रमाणात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(नक्की वाचा-  Palghar News: पालघरच्या कोहोज किल्ल्याचं रुप बदललं! ऐतिहासिक तोफांची शान वाढली)

राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी!

मुख्य मान्सून दाखल होण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागांत हवामान बदलले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संध्याकाळच्या वेळी होणाऱ्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, मुख्य मान्सूनचा अंदाजही हवामान विभागाने कायम ठेवला आहे.

पुढील 3 ते 4 दिवसांत मान्सूनची गती आणखी वाढणार असून, मुंबई महापालिकेनेही (BMC) मान्सूनच्या आगमना पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाई आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com