जाहिरात

Mumbai News: 4 वर्षांत 20 हजार पर्यटक! मुंबई महानगरपालिकच्या ऐतिहासिक वास्तूची सहल आहे खास

महानगरपालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) तसेच खाकी टूर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने दर शनिवार-रविवारी मिळून एकूण 6 सहली आयोजित केल्या जातात.

Mumbai News: 4 वर्षांत 20  हजार पर्यटक! मुंबई महानगरपालिकच्या ऐतिहासिक वास्तूची सहल आहे खास
मुंबई:

उत्तम दर्जाच्या नागरी सेवा-सुविधा पुरविण्यासोबतच मुंबईतील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मुंबई महानगरपालिका अविरत प्रयत्नशील आहे. यासोबतच मुंबई महानगरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्यासाठीदेखील महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जातात. मुंबईत अनेक ऐतिहासिक वास्तू आणि पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची इमारत. जानेवारी 2021 ते जुलै 2025 या साडेचार वर्षांत मुंबईकर तसेच देश-विदेशातील मिळून सुमारे 20 हजार पर्यटकांनी महानगरपालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूची सहल केली आहे. महानगरपालिका, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, खाकी टूर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने दर शनिवारी, रविवारी या सहलीचे आयोजन केले जाते. 

Latest and Breaking News on NDTV

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनात  महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. याच अनुषंगाने, महानगरपालिका मुख्यालयाची ऐतिहासिक वास्तू नागरिकांना तसेच पर्यटकांना पाहता यावी, यासाठी पालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि खाकी टूर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने दर शनिवारी, रविवारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय पुरातन वारसा दर्शन सहलीचे आयोजन केले जाते. दीडशे वर्षांपूर्वी म्हणजे 4 सप्टेंबर 1873 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेची पहिली सभा झाली असली, तरी या महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या मुख्य इमारतीमध्ये 16 जानेवारी 1893 रोजी प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ झाला. तेव्हापासून ही इमारत आणि महानगरपालिका आजतागायत सक्षमपणे मुंबईचे पालकत्व सांभाळते आहे.

नक्की वाचा - Viral video:' मराठी येत नाही तर बाहेर निघ', लोकलमध्ये महिलांच्या डब्यात जोरदार राडा

‘इंडो सार्सानिक' स्थापत्य शैलीतील या भव्य इमारतीतून महानगरपालिका ही महानगराचा गाडा हाकते. महानगरपालिकेच्या इमारतीच्या बांधकामास 25 एप्रिल 889 रोजी प्रारंभ झाला. तत्कालीन मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मिळालेल्या 6600.65 चौरस वार जमिनीवर ही इमारत बांधण्यात आली. महानगरपालिका मुख्यालय इमारतीचे संकल्पचित्र तत्कालीन प्रख्यात वास्तुशास्त्रज्ञ एस. डब्ल्यू. स्टिव्हन्स यांनी तयार केले होते. 31 जुलै 1893 रोजी ह्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. तेव्हा थॉमस ब्लॅनी हे अध्यक्ष होते. तर हॅरी ए.अ‍ॅक्वर्थ हे आयुक्त होते. रावबहादूर सीताराम खंडेराव हे बांधकाम खात्याचे निवासी अभियंता होते. तर, बांधकामाचे कंत्राट व्यंकू बाळाजी यांनी घेतले होते. या इमारतीसाठी 11,88,082 रुपये एवढ्या खर्चास मान्यता देण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात रु.11,19,969/- एवढाच खर्च आला. बांधकामाशी संबंधित असणारे कंत्राटदार, कारागीर व अभियंते यांनी अंदाजापेक्षा कमी कालावधीत व कमी खर्चात इमारत पूर्ण करून महानगरपालिकेच्या इतिहासात एक उच्च आदर्श निर्माण करून ठेवलेला आहे. बांधकामाचे कंत्राट घेतलेले व्यंकू बाळाजी महात्मा फुले यांचे निकटवर्ती होते. 

Latest and Breaking News on NDTV

नक्की वाचा - Political news: ठाकरे-फडणवीसांची गुप्त भेट झाली का? फडणवीसांच्या जवळच्या मंत्र्याने सर्वच सांगितलं

महानगरपालिकेची इमारत म्हणजे मुंबई महानगराच्या नागरी सेवेचा व विकासाचा साक्षीदार आहे. भारतातील अग्रगण्य शहर (Urbs Prima In Indis) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगराचे प्रतिनिधीत्व या इमारतीचा 235 फूट उंचीचा मनोरा करीत आहे. सन 1873 पासून ते आजपर्यंत म्हणजे सुमारे दीडशे वर्षांहून अधिक काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनेक स्थित्यंतरे अनुभवली. अनेक आव्हानांचा सामना केला. अनेक संकंटांवर मात केली, तसेच दैदिप्यमान यशाची कितीतरी शिखरेही सहज पादाक्रांत केली. सन 1873 पासून बृहन्मुंबई महानगरपालिका स्वच्छ, सुंदर, हरित, प्रदूषणमुक्त आणि गतिमान मुंबईकरिता जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने कामकाज करीत आहे. पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य, रस्ते, पूल, घनकचरा व्यवस्थापन, पर्जन्य जल वाहिन्या,  शिक्षण, क्रीडा, उद्याने आणि मैदाने, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन आदी विविध खात्यांच्या कामात नव्या पायाभूत प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली आहे. 

Latest and Breaking News on NDTV

नक्की वाचा - Pune News: भोंदू ज्योतिष अखिलेश राजगुरुला अटक, पुण्यात 25 वर्षीय तरुणीचा धक्कादायक आरोप

महानगरपालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) तसेच खाकी टूर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने दर शनिवार-रविवारी मिळून एकूण 6 सहली आयोजित केल्या जातात. रविवार 20 जुलै २०२५ रोजी, या टूरने आपल्या 20,000 व्या पर्यटकाचे स्वागत केले.या सहलीत मुंबईच्या विकासगाथा, महानगरपालिकेच्या समृद्ध इतिहासाचा आणि या भव्य इमारतीच्या वास्तुशिल्पाची माहिती दिली जाते. ही सहल करू इच्छिणाऱ्यांना bookmyshow.com या संकेतस्थळावरून रुपये 350 शुल्क भरून नोंदणी करता येते, अशी माहिती सहल संयोजक भरत गोठोसकर यांनी दिली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com