जाहिरात

Amit Thackeray: अमित ठाकरेंविरोधात पहिला गुन्हा दाखल; नवी मुंबईत पोलिसांसमोरच मनसे कार्यकर्त्यांनी...

Navi Mumbai: नेरुळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा पूर्ण होऊनही गेल्या चार महिन्यांपासून फक्त अनावरणाच्या प्रतीक्षेत कपड्याने झाकून धुळखात पडलेल्या अवस्थेत होता.

Amit Thackeray: अमित ठाकरेंविरोधात पहिला गुन्हा दाखल; नवी मुंबईत पोलिसांसमोरच मनसे कार्यकर्त्यांनी...

राहुल कांबळे, नवी मुंबई

मनसे नेते अमित ठाकरे आणि 70 मनसे कार्यकर्त्यांना नवी मुंबई पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरुळमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे परवानगी न घेता अनावरण आणि गर्दी जमवल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. अमित ठाकरेविरोधात हा पहिलाच राजकीय गुन्हा आहे. 

नेरुळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा पूर्ण होऊनही गेल्या चार महिन्यांपासून फक्त अनावरणाच्या प्रतीक्षेत कपड्याने झाकून धुळखात पडलेल्या अवस्थेत होता. दरम्यान अमित ठाकरे हे कौपरखैरणे येथे मनसे शाखेच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती झाकून ठेवल्याची माहिती मिळाली.

पोलिसांसमोरच अनावरण अन् राडा

माहिती मिळताच, अमित ठाकरे यांनी तात्काळ मनसे कार्यकर्त्यांच्या मदतीने पुतळ्याचे अनावरण करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी पोलिसांची उपस्थिती असतानाही कोणतीही परवानगी न घेता पुतळ्यावरील कापड हटवले.

पाहा VIDEO

यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काहीशी झटापड झाल्याचेही पाहायला मिळाले. यामुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी परवानगी न घेता सार्वजनिक मालमत्तेवर हस्तक्षेप केल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसे कार्यकर्त्यांवर पोलीसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: लग्नातील एक घोषणा अन् PMO तील अधिकारी थेट जेलमध्ये , DCP ची स्मार्ट कामगिरी चर्चेत)

अमित ठाकरे यांनी याबाबत म्हटलं की,"मी  येथे शाखा उद्घाटनासाठी आलो होतो. त्यावेळी मला कळालं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या चार महिन्यांपासून तयार आहे, मात्र केवळ उद्घाटन न झाल्याने तो धूळखात पडला आहे. हा पुतळा लोकांच्या मागणीवरून उभारण्यात आला आहे. मात्र सरकारमधल्या कुठल्याही नेत्याला अथवा मंत्र्याला महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करायला वेळ मिळत नाही."

महाराजांसाठी अनेक केसेस अंगावर घेऊ

अमित ठाकरे पुढे म्हणाले की, "ज्यांना आपण आराध्य दैवत मानतो, त्या छत्रपतींसाठी त्यांना वेळ मिळत नसेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. ही माझ्यावरील आयुष्यातील पहिला राजकीय केस आहे. महाराजांसाठी माझ्यावर केस होत असेल तर मला आनंदच आहे. वेळ पडली तर महाराजांसाठी अशा अनेक केसेस अंगावर घेऊ."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com