VIDEO: मला हिंदू मुली आवडतात म्हणत कंपनीतील तरुणीला पाठवायचा अश्लील मेसेज, मुंबईत टेलिकॉलरचा विकृतपणा उघड

Mumbai News: मुंबईतील आग्रीपाडा परिसरात एका टेलिकॉलर तरुणाने सहकारी तरुणीला अश्लील मेसेज पाठवून त्रास दिल्याची घटना समोर आली आहे, वाचा सविस्तर बातमी...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Mumbai News: महिलांसाठी ऑफिस सुरक्षित आहे का? नवीन घटना चर्चेत"
प्रतिकात्मक फोटो Canva

- रुतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai News: मुंबईत एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीला तिच्याच सहकाऱ्याने अश्लील मेसेज पाठवून त्रास दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. आग्रीपाडा परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित तरुण आणि पीडित तरुणी हे दोघेही एका कंपनीत टेलिकॉलर म्हणून कार्यरत होते.

वारंवार पाठवत होता अश्लील मेसेज

माहितीनुसार आरोपी तरुणाने पीडितेला वारंवार अश्लील स्वरूपाचे मेसेज पाठवले. इतकेच नव्हे तर "मला हिंदू मुली आवडतात" असे म्हणत तो तिच्याशी अयोग्य पद्धतीने संवाद साधत होता. पीडितेने त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने सतत कॉल करणे, मेसेज पाठवणे आणि तिचा पाठलाग करणे सुरूच ठेवले. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली आली.

Advertisement

शेवटी त्रास असह्य झाल्याने पीडितेने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेत आरोपीविरुद्ध BNS 354 अंतर्गत गुन्हा नोंदवला. तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

(नक्की वाचा: Mumbai High Court: वय पन्नाशी पार, तरीही आई होण्याची इच्छा, मुंबई हायकोर्टाने काय म्हटलं? वाचा संपूर्ण प्रकरण)

कडक कारवाई करण्याची मागणी

या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावरही प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्याला भेट देऊन पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपीवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी केली. त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहनही केले.

(नक्की वाचा: Nagpur News: लग्नाचे आमिष, अल्पवयीनचे लैंगिक शोषण आणि बालविवाह! एका कारवाईने उघडले नराधमाचे काळे कारनामे)

ही घटना केवळ एका तरुणीपुरती मर्यादित नसून कामाच्या ठिकाणी महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांचे प्रतीक आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईसोबतच जागरूकता आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Mumbai Corporate Jihad | 'मला हिंदू मुली आवडतात' म्हणत मुलीला त्रास? मुंबईमध्ये कॉर्पोरेट जिहाद?