Mumbai News : मुंबईतील विक्रोळी पार्क साईट येथील वर्षा नगरमधील जनकल्याण सोसायटीजवळ आज पहाटे भूस्खलनाची घटना घडली. ही घटना 16 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 02 वाजून 39 मिनिट वाजता घडल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत एका झोपडीवर टेकडीवरून माती आणि दगडांचा ढिगारा कोसळला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक वॉर्ड कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. या घटनेत चार जण जखमी झाले होते, त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
(नक्की वाचा- Maharashtra Rains: मुंबई, रायगडला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट; गरज असेल तरच घराबाहेर पडा, BMC चं आवाहन)
राजवाडी रुग्णालयातील डॉ. निखिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी दोघांना मृत अवस्थेत आणण्यात आले होते, तर अन्य दोघे स्थिर आहेत आणि त्यांच्यावर ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेतील मृतांची आणि जखमींची नावे
- मृत- शालू मिश्रा (19, महिला)
- मृत- सुरेश मिश्रा (50, पुरुष)
- जखमी- आरती मिश्रा (45, महिला)
- जखमी - ऋतुराज मिश्रा (20, पुरुष) - दाखल
(नक्की वाचा- Mumbai Rain: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत तुफान पाऊस! सखल भागात पाणी साचलं, वाहतूक सेवा, लोकलची स्थिती काय?)
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भाग भूस्खलनासाठी संवेदनशील असून, ही जमीन कलेक्टर यांच्या मालकीची आहे. या घटनेमुळे प्रशासनावर योग्य उपाययोजना करण्यासाठी दबाव वाढत आहे.