मुंबईतील मुलुंड परिसरात आज 18 मार्च रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुलुंड पूर्व येथे 750 मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने टी विभागातील काही भागातील पाणीपुरवठा दिनांक 18 मार्च रोजी काम पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मलनिस्सारण प्रकल्प विभागामार्फत सूक्ष्म बोगद्याचे काम सुरू असताना 17 मार्च रोजी मुलुंड पूर्व येथे 750 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीस हरी ओम नगर व म्हाडा कॉलनीमध्ये असलेल्या नाल्याच्या तळाला हानी पोहोचली. त्यामुळे जलवाहिनीस मोठ्या प्रमाणावर गळती आढळून आली. सदरच्या ठिकाणी जलवाहिनी दुरुस्तीचे काम घेण्यात आले आहे.
(नक्की वाचा- मुंबई विमानतळावर सुरु होणार प्रीपेड ऑटो रिक्षा; कसा असेल मेगाप्लॅन? वाचा...)
दुरुस्तीचे काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी अंदाजे 12 ते 14 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. आजूबाजूच्या अनेक भागात दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या परिसरातील नागरिकांनी, पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असा आवाहन करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- "बरं झालं पक्ष फुटला…", सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल)
कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार
मुलुंड पूर्व - पूर्व द्रुतगती मार्गाच्या पूर्वेकडील भाग, म्हाडा वसाहत , हरी ओम् नगर
मुलुंड पूर्व - पूर्व द्रुतगती मार्गाच्या पश्चिमेकडील भाग ते मुलुंड स्टेशनपर्यंतचा परिसर