Mumbai News:'बारकोड मेकर' रोशन कोण आहे? काय काम करायचा? पावसाच्या पाण्याच्या वादातून एका प्रवाशाला थेट संपवलं!

मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लासमधील डब्यात हादरवून टाकणाऱ्या हत्याकांडाच्या आरोपीला मुंबई रेल्वे पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News : मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लासमधील डब्यात हादरवून टाकणाऱ्या हत्याकांडाच्या आरोपीला मुंबई रेल्वे पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली आहे. एका क्षुल्लक वादात एक सहप्रवाशाचा जीव घेणारा या आरोपीचं नाव रोशन सुवर्णा असल्याचं समोर आलं आहे. तांत्रिक विश्लेषण आणि सतर्कतेच्या जोरावर पोलिसांनी कुर्ल्यातून आरोपीला ताब्यात घेतलं.  

आरोपी रोशन मीरा रोडचा राहणारा...

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, अटक केलेला ३० वर्षीय आरोपी रोशन सुवर्णा हा मीरा रोड इस्ट, जिल्हा ठाणे येथील राहणारा आहे. तो  बारकोड बनविण्याचं काम करतो. तो अंधेरी भागात काम करीत होता.

Advertisement

नेमका वाद कसा सुरू झाला?

२३ जून २०२६ च्या रात्री साधारण १०.५० वाजता नालासोपाराजवळ एका फास्ट लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्ब्यात पावसाचं पाणी आत येत होतं. यावेळी प्रवासी मयंकने ट्रेनचं दार बंद करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी रोशनचा त्याच्यासोबत वाद झाला. हा वाद इतका वाढला की आरोपीने पीडित तरुणावर जीवघेणा हल्ला केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. 

नक्की वाचा - तुकाराम मुंढेंकडून हॉटेलधारकांसाठी नवी नियमावली; किचन कसं असावं तेही सांगितलं!

आरोपी रोशनला कसं पकडलं?

मयंकची हत्या केल्यानंतर आरोपी रोशन फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. त्यावेळी पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्णाच्या पालकांना आधी ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी रोशनला सरेडर होण्यास सांगितलं. बिथरलेला रोशन कुर्ला येथे पोलिसांना शरण गेला. रोशन हा त्याच्या वडिलांसोबत अंधेरी येथे लेबलिंगचं काम करतो. ते दोघंही नेहमी एकत्रच घरी जायचे. मात्र काल रोशनचे बाबा आधीच घरी निघून गेले आणि नंतर रोशन एकटा घरी जात होता.